सेवालाल महाराज यांच्या जयंंतीनिमित्त औरंगाबादेत उत्साहात रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 11:57 PM2018-02-15T23:57:48+5:302018-02-15T23:58:01+5:30

संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीचा आज अमाप उत्साह पाहावयास मिळाला. वाहन रॅलीत सहभागी होऊन शेकडो युवक वसंतराव नाईक चौकातील पुतळ्यापर्यंत आले आणि तेथे त्यांनाही मन:पूर्वक अभिवादन केले.

Rally in Aurangabad to celebrate Sewa Lal Maharaj's birthday | सेवालाल महाराज यांच्या जयंंतीनिमित्त औरंगाबादेत उत्साहात रॅली

सेवालाल महाराज यांच्या जयंंतीनिमित्त औरंगाबादेत उत्साहात रॅली

googlenewsNext
ठळक मुद्देलक्षवेधी रॅली : वाहनस्वार शेकडो युवक सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : संत शिरोमणी सेवालाल महाराजांच्या जयंतीचा आज अमाप उत्साह पाहावयास मिळाला. वाहन रॅलीत सहभागी होऊन शेकडो युवक वसंतराव नाईक चौकातील पुतळ्यापर्यंत आले आणि तेथे त्यांनाही मन:पूर्वक अभिवादन केले.
आॅल इंडिया बंजारा टायगर्सने दुपारी क्रांतीचौकातून काढलेली वाहन रॅली लक्षवेधी ठरली. लाल रंगांचा फेटा बांधून शेकडो युवक या रॅलीत सहभागी झाले होते. हातात लाल-पांढरा आणि पिवळे रंग असलेले झेंडे होते. काही जणांच्या हातात पांढºया रंगाचेही झेंडे होते. बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाबूराव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तसेच वाहन रॅलीत असलेल्या संत सेवालाल महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजनही त्यांनी केले.
या रॅलीचे नेतृत्व आॅल इंडिया बंजारा टायगर्सचे संस्थापक अध्यक्ष व राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. अशोक राठोड, उपाध्यक्ष वनसिंग चव्हाण यांनी केले. ही रॅली सिल्लेखाना चौक, बंजारा कॉलनी, सम्राट अशोक चौक, मोंढा नाका, आकाशवाणीसमोरून सेव्हन हिल उड्डाणपुलावरून कॅनॉट प्लेस, वसंतराव नाईक चौक येथे आली आणि तेथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी बाबूराव पवार यांनी सेवालाल महाराजांबद्दल माहिती देऊन बंजारा समाज हा संघटित होणे ही काळाची गरज आहे, यावर भर दिला. सेवालाल महाराजांनी देशभरातील बंजारा समाज बंधू-भगिनींना स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा दिली. सेवालाल महाराजांचे विचारच बंजारा समाज संघटित होण्यास कारणीभूत ठरत आहेत आणि त्यांचे प्रेरणादायी विचारच बंजारा समाजाला एक ना एक दिवस देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवून देणार आहेत, असा आशावादही बाबूराव पवार यांनी यावेळी व्यक्त केला. अ‍ॅड. रमेश टी. राठोड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
‘लालेम लाल एकच लाल सेवालाल’, हा आवाज कुणाचा... आॅल इंडिया बंजारा टायगर्सचा, एकच टायगर, बंजारा टायगर, एक बंजारा... लाख बंजारा, जगात भारी... १५ फेब्रुवारी अशा जोशपूर्ण घोषणा रॅलीभर देण्यात आल्या.
शंकर पी. चव्हाण, राकेश पवार, राजेंद्र जाधव, रमेश तोफाननाईक, बबन चव्हाण, संतोष राठोड, राजू चव्हाण, मानसिंग राठोड, शुभम चव्हाण, पंडित चव्हाण, मदन चव्हाण, गोरख चव्हाण, विजय चव्हाण, नीतेश चव्हाण, मधुर चव्हाण, आकाश चव्हाण, प्रकाश चव्हाण, साहेबराव चव्हाण, गोरख राठोड, धामसिंग राठोड, प्रताप राठोड, नीलेश जाधव, मोहन चव्हाण, देवीदास राठोड, राजू पवार, पंडित चव्हाण आदींनी या रॅलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Rally in Aurangabad to celebrate Sewa Lal Maharaj's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.