‘त्या’ अभ्यासक्रमाचा प्रस्ताव पाठवणार शासनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:07 AM2021-01-16T04:07:17+5:302021-01-16T04:07:17+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी ...

The proposal of 'that' course will be sent to the government | ‘त्या’ अभ्यासक्रमाचा प्रस्ताव पाठवणार शासनाकडे

‘त्या’ अभ्यासक्रमाचा प्रस्ताव पाठवणार शासनाकडे

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ हा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे पाठविण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला असून, तोपर्यंत ‘पीजी डिप्लोमा इन पार्लमेंटरी अफेयर्स’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

मागील काही दिवसांपासून ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ की ‘स्कूल ऑफ गव्हर्नन्स’ या नावावरून विद्यापीठात दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. दरम्यान, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्याची इच्छा नाही. त्यामुळे ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ या नावाच्या मान्यतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तोपर्यंत ‘पीजी डिप्लोमा इन पार्लमेंटरी अफेयर्स’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केला जाईल.

दरम्यान, १९५६ साली बाबासाहेबांनी मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयात ‘ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स’ हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या लोकप्रतिनिधीमध्ये जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची कुवत असावी, प्रभावी वक्ता, उत्कृष्ट संसदपटू निर्माण करण्यासाठी त्यांनी हा अभ्यासक्रम सुरू केला होता. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांची तारीखही निश्चित झाली. परंतु, दुर्दैवाने त्यांचे सहा- सात दिवसांअगोदरच महापरिनिर्वाण झाले. पुढे काही दिवसांनंतर हा अभ्यासक्रमही बंद पडला.

अडीच-तीन वर्षांपूर्वी मिलिंद विज्ञान महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एम.ए. वाहूळ यांच्या नेतृत्वाखाली काही ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींनी तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची भेट घेऊन बाबासाहेबांच्या संकल्पनेतील हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला. सिनेटमध्येही यासंबंधीचा ठराव चर्चेला आला. जितेंद्र देहाडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध ठिकाणी भेटी देऊन या अभ्यासक्रमाच्या नावाला आक्षेप येऊ नये, याची दक्षता घेतली. दुसरीकडे रिपाइं युवा आघाडीचे नागराज गायकवाड यांनी सिद्धार्थ महाविद्यालयाकडून माहितीच्या अधिकाराखाली हा अभ्यासक्रम सुरू नसल्याची खात्री करून घेतली.

चौकट....

जाहीर कार्यक्रमात केली अभ्यासक्रमाची घोषणा

विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी आगामी वर्षापासून विद्यापीठात एक वर्षाचा ‘डिप्लोमा इन पार्लमेंटरी अफेयर्स’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे विद्यापीठात या नावावरून वाद पेटण्याची शक्यता आहे. तथापि, विद्यापीठाने बाबासाहेबांच्या संकल्पनेतील अभ्यासक्रमात बदल करणार नसल्याची भूमिका घेतली आहे.

Web Title: The proposal of 'that' course will be sent to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.