कारागृहात लॉकअपवर डोके आपटून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 09:09 PM2020-02-08T21:09:04+5:302020-02-08T21:12:17+5:30

उपचार करण्यासाठी आलेल्या नर्स आणि डॉक्टर, तुरुंगाधिकाऱ्यांना कैद्याने धमकावले

Prisoner attempts suicide by hitting head on lockup in prison | कारागृहात लॉकअपवर डोके आपटून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

कारागृहात लॉकअपवर डोके आपटून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

googlenewsNext
ठळक मुद्दे हर्सूल ठाण्यात कैद्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

औरंगाबाद : न्यायालयाच्या आदेशाने जालना येथून हर्सूल मध्यवर्ती कारागृहात डांबलेल्या एका आरोपीने आरडाओरड करीत तेथील लॉकअपवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.७) रात्री घडली. डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे पाहून उपचार करण्यासाठी आलेल्या नर्स आणि डॉक्टर, तुरुंगाधिकाऱ्यांना त्याने धमकावल्याचे समोर आले. याविषयी हर्सूल ठाण्यात कैद्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

चरणसिंग प्रेमसिंग सुलावने (रा. जालना) असे जखमी कैद्याचे नाव आहे. जालना पोलिसांनी एका गुन्ह्यात त्याला अटक केली होती. न्यायालयाच्या आदेशाने ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्याला हर्सूल कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून तो उद्धट वागत असून कारागृह पोलिसांना शिवीगाळ करीत धमकावत होता. हे पाहून कारागृह प्रशासनाने आरोपीला स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवले. ७.४५ वाजेच्या सुमारास त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार तुरुंग रक्षकांकडे केली. नर्सिंग आर्डली भरत फड लगेच तेथे गेले आणि डॉक्टरांना बोलावून घेतो, असे सांगितले. त्यावेळी त्याने, मला आताच घाटीत पाठवा नाही तर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेतो, मी काय करू शकतो, तुम्हाला पाहायचे का? असे म्हणत त्याने स्वत:चे डोके तेथील लॉकअपवर जोरजोरात आदळून आत्महत्येचा प्रयत्न केला. 

रक्तस्राव होत असल्याचे पाहून तुरुंगाधिकारी प्रशांत उखळे आणि अन्य रक्षकांनी त्यास पकडले. यानंतरही तो सर्वांना संपवून टाकीन, मला येथून बाहेर काढा, असे ओरडत होता. घाटीत उपचारासाठी त्याला पाठविल्यास तेथील सामान्य नागरिक आणि डॉक्टरांना तो त्रास देऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने डॉक्टरांच्या निगराणीखाली तेथेच त्याच्यावर उपचार केले. याप्रक रणी तुरुंगाधिकारी उखळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुलावनेविरुद्ध हर्सूल ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणे, कारागृह पोलीस आणि डॉक्टरांच्या कामात अडथळा आणणे आदी कमलांनुसार गुन्हा नोंदविला.

Web Title: Prisoner attempts suicide by hitting head on lockup in prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.