महावितरणच्या उच्चदाब वाहिनीवर कोसळली विज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 04:45 PM2020-10-10T16:45:18+5:302020-10-10T16:46:21+5:30

सिडको वाळूजमहानगर ते तीसगाव चौकातील ३३ के.व्ही. उच्च दाब वाहिनीवर शुक्रवारी दुपारी विज कोसळल्यामुळे परिसरात पाच विज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर दूरुस्तीचे काम केल्यामुळे रात्री उशिरा या परिसरातील विज पुरवठा पुर्ववत झाला.

Power outage on MSEDCL high pressure line | महावितरणच्या उच्चदाब वाहिनीवर कोसळली विज

महावितरणच्या उच्चदाब वाहिनीवर कोसळली विज

googlenewsNext

वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगर ते तीसगाव चौकातील ३३ के.व्ही. उच्च दाब वाहिनीवर शुक्रवारी दुपारी विज कोसळल्यामुळे परिसरात पाच विज पुरवठा खंडीत झाला होता. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर दूरुस्तीचे काम केल्यामुळे रात्री उशिरा या परिसरातील विज पुरवठा पुर्ववत झाला.

वाळूज महानगर व शहरात शुक्रवारी दुपारी विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह काही भागांत जोरात पाऊस सुरु झाला होता. त्यातच वाळूजमहानगर ते तीसगाव चौक रस्त्यावरील महावितरणच्या ३३ के. व्ही. उच्च दाब वाहिनीवर दुपारी ४ वाजेच्या सुमारास विज कोसळली. त्यामुळे महावितरणचे इन्सुलेटर नादूरुस्त होऊन सिडको वाळूजमहानगर, तीसगाव, साऊथसिटी, पंढरपूरचा अर्धा भाग आदीसह परिसरातील विज पुरवठा खंडीत झाला.

सिडको वाळूजमहानगर सबस्टेशन अंतर्गत तीसगाव, म्हाडा कॉलनी, सिडको वाळूजमहानगर, साऊथसिटी, अर्धे पंढरपूर आदी गावांचा समावेश आहे. या परिसरात जवळपास १५ हजारांच्यावर विद्युत ग्राहक असून शुक्रवारी विज पडून विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे या नागरिकांना जवळपास ५ तास काळोखात रहावे लागले.

Web Title: Power outage on MSEDCL high pressure line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.