Coronavirus: मराठवाडा कोरोनाच्या विळख्यात, संचारबंदी लादण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 03:46 AM2020-07-03T03:46:57+5:302020-07-03T04:51:52+5:30

विभागात औरंगाबादचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वांत कमी म्हणजे ४७.८७ टक्के आहे. परभणीचा ९३.६३, बीडचा ९०.४९ तर नांदेडचा ७४.४९ असल्याचे अहवालात नमूद केले आहे

Possibility of curfew in Marathwada Corona | Coronavirus: मराठवाडा कोरोनाच्या विळख्यात, संचारबंदी लादण्याची शक्यता

Coronavirus: मराठवाडा कोरोनाच्या विळख्यात, संचारबंदी लादण्याची शक्यता

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाडा कोरोनाच्या विळख्यात आला असून, विभागात महिनाभरात ८ हजारांपर्यंत रुग्णसंख्या गेली आहे. २ जून रोजी हा आकडा २ हजारांच्या जवळपास होता. ७५ टक्के रुग्ण एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. रुग्णवाढीचा वेग पाहता विभागात संचारबंदी लागू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

२ जुलै रोजी विभागात ३०० च्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. विभागातील चार महापालिकेच्या हद्दीमध्ये ५,३०० च्या आसपास रुग्ण आहेत, तर ग्रामीण भागात २ हजार ८४६ च्या आसपास आकडा गेला आहे. मराठवाड्यात ८ हजार १४४ रुग्ण असून, ४ हजार ३२७ रुग्ण बरे झाले आहेत. विभागात आजवर ३४८ मृत्यू झाले असून, यात औरंगाबादमध्ये २७७ रुग्ण दगावले आहेत. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी परिस्थितचा आढावा घेतला.

औरंगाबादचा रिकव्हरी दर कमी
विभागात औरंगाबादचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वांत कमी म्हणजे ४७.८७ टक्के आहे. परभणीचा ९३.६३, बीडचा ९०.४९ तर नांदेडचा ७४.४९ असल्याचे अहवालात नमूद केले आहे, तर रुग्ण डबल होण्याचा दर बीड जिल्ह्यात ८३.३० टक्के आहे. औरंगाबादचा १३.८० टक्के आहे. बाकीच्या जिल्ह्यांचा दरही याच आकड्यांच्या आसपास आहे.

विभागात ५७१ कंटेन्मेंट झोन
विभागात सर्व मिळून ५७१ कंटेन्मेंट झोन करण्यात आले आहेत. झोनमध्ये सर्व मिळून ९५७ इंडेक्स केस आहेत. औरंगाबाद ३३, नांदेड ९२, परभणी २३, जालना १५०, लातूर १३१, बीड ९, हिंगोली ५२, उस्मानाबादमध्ये ८१ झोन आहेत.

औरंगाबादेत बाधित सहा हजार पार
औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी कोरोना बाधितांची संख्या सहा हजार पार झाली. जिल्ह्यात दिवसभरात २४९ नवे रुग्ण आढळले, तर सहा जणांचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यात ४०, परभणी जिल्ह्यात चार, नांदेड जिल्ह्यात सात रुग्णांची भर पडली. मराठवाड्यात गुरुवारी ३०० रुग्ण वाढल

Web Title: Possibility of curfew in Marathwada Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.