पूर्ववैमनस्यातून पतीलाच पाठविली पत्नीची अश्लील छायाचित्र; एका विरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 06:56 PM2020-12-18T18:56:18+5:302020-12-18T18:56:48+5:30

अश्लील भाषेत शिवीगाळ करून धमकावल्याचे निदर्शनास आले. 

Pornographic photo of wife sent to husband out of prejudice; Filed a crime against one | पूर्ववैमनस्यातून पतीलाच पाठविली पत्नीची अश्लील छायाचित्र; एका विरोधात गुन्हा दाखल

पूर्ववैमनस्यातून पतीलाच पाठविली पत्नीची अश्लील छायाचित्र; एका विरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देफेसबुकवर महिलेचे अश्लील छायाचित्र प्रसारित करणाऱ्यावर गुन्हा

औरंगाबाद: पूर्ववैमनस्यातून ओळखीच्या तरुणाच्या बायकोचे बनावट अश्लील छायाचित्र फेसबुकवर टाकून बदनामी करीत धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध पुंडलिकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

भाविक नितीन रागिना (रा. यवतमाळ, सिव्हिल लाईन) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार तरुण पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर असून तो गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथे राहणाऱ्या डॉक्टर बहिणीकडे राहण्यासाठी आला होता. २५ सप्टेंबर रोजी रात्री तो फेसबूक पाहत असताना त्याच्या अकाऊंटवरील मेसेंजर बॉक्समध्ये भाविक रागिना याने मेसेज आणि छायाचित्र पाठविल्याचे दिसले. त्यांनी मेसेज बॉक्स उघडला असता यात तक्रारदाराच्या पत्नीचे ‘एडीट’ केलेले बनावट नग्न छायाचित्रे दिसली. तसेच अश्लील भाषेत त्यांना शिवीगाळ करून धमकावल्याचे निदर्शनास आले. 

त्यांनी अधिक माहिती घेतली असता भाविकचे वडील नितीन हे तक्रारदार यांच्या महाविद्यालयात होते. तक्रारदार यांच्या बहिणीविषयीही त्याने अश्लील टिप्पणी केल्याचे समोर आले. याच आरोपीने गेल्यावर्षी १८ एप्रिलला अशाच प्रकारे अश्लील भाषेत शिवीगाळ करीत धमकावले होते . मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तक्रारदाराने त्याला ब्लॉक केले होते. दरम्यान त्याने पुन्हा अश्लील छायाचित्र तयार करून सोशल मिडियावर टाकून बदनामी करीत धमकावणे सुरूच ठेवल्यामुळे याविषयी त्यांनी राज्य सायबर पोलिसांना ईमेल मार्फत तक्रार केली होती. ही तक्रार सायबर पोलीस ठाण्यामार्फत पुंडलिकनगर पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
 

Web Title: Pornographic photo of wife sent to husband out of prejudice; Filed a crime against one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.