पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराचा महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 04:54 PM2020-02-25T16:54:53+5:302020-02-25T16:56:08+5:30

मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली.

police records criminal rapes on woman in Aurangabad | पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराचा महिलेवर अत्याचार

पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराचा महिलेवर अत्याचार

googlenewsNext

औरंगाबाद: पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असलेल्या एका जणाने मुकुंदवाडी परिसरातील एका ओळखीच्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना २२ रोजी रात्री अकरा ते साडअकरा वाजेदरम्यान घडली. याविषयी पीडितेने नोंदविलेल्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि अ‍ॅट्रॉसिटी कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली.

ज्ञानेश्वर सुरेश गिरी (रा. मुकुंदवाडी )असे आरोपीचे नाव आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांनी सांगितले की, आरोपी ज्ञानेश्वर गिरीविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाची विविध गुन्हे दाखल आहे.  विविध प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याचा गुन्ह्यांचा आलेख वाढतच होता. यामुळे त्याला पोलीस उपायुक्तांनी तडीपार केले होते. तडीपारीची मुदत संपल्यानंतर तो शहरात परतला तेव्हापासून त्याने एकही गुन्हा केला नव्हता. एवढेच नव्हे तर त्याने त्याचे राहण्याची कॉलनीही बदलून तो नवीन वसाहतीत राहण्यास गेला होता.

२२ रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास तो राहत असल्याच्या घराशेजारील ३५ वर्षीय विवाहिता दार उघडे ठेवून पतीची प्रतिक्षा करीत होती. तेव्हा आरोपी गिरी अचानक तिच्या घरी गेला आणि तुझ्या आईचा फोन आल्याचे सांगून तिला तो तिच्या घरी घेऊन गेला. यानंतर मला तू आवडते आणि  तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे म्हणून त्याने तिच्यासोबत बळजबरीने अत्याचार केला. यावेळी  तिला जीवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून दिले. गिरी हा गुंडप्रवृत्तीचा असल्यामुळे घाबरलेल्या पीडितेने दोन दिवस आरोपीने केलेल्या कृत्याबद्दल वाच्यता केली नाही. मात्र २४ रोजी रात्री तिने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविल्याची माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त रविंद्र साळोखे हे करीत आहेत. 

Web Title: police records criminal rapes on woman in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.