गोंधळ थांबवा म्हणताच त्याने फौजदाराची पकडली कॉलर; पोलीस कर्मचाऱ्यांनाही केली शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 02:05 PM2020-01-15T14:05:32+5:302020-01-15T14:07:35+5:30

, बजाजनगरातील मोहटादेवी चौकात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोघे गोंधळ घालत होते

Police personnel abducted in Waluj Mahanagar | गोंधळ थांबवा म्हणताच त्याने फौजदाराची पकडली कॉलर; पोलीस कर्मचाऱ्यांनाही केली शिवीगाळ

गोंधळ थांबवा म्हणताच त्याने फौजदाराची पकडली कॉलर; पोलीस कर्मचाऱ्यांनाही केली शिवीगाळ

googlenewsNext

वाळूज महानगर: सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या दोघांना समजावण्यासाठी गेलेल्या फौजदाराची एकाने कॉलर पकडून सोबतच्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची घटना मंगळवार (दि.१४) मध्यरात्री बजाजनगरात घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगरातील मोहटादेवी चौकात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन इसम सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गोंधळ घालत असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच फौजदार राजेंद्र बांगर, पोकॉ.शेख फहीम, पोकॉ. शंकर बारवाल, पोकॉ. पंकज साळवे हे रात्री १ वाजेच्या सुमारास घटनास्थळजवळ पोहचले. या ठिकाणी हजर असणाऱ्या महेश पाटील याच्याकडे फौजदार बांगर यांनी विचारपुस करण्यास सुरवात केली असता त्याने, 'तुम्ही एक मिनिटात येथुन निघुन जा, मी येथेच थांबणार असून तुम्हाला काय करायचे ते करा', असे म्हणत पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावुन आला. 

दरम्यान, फौजदार बांगर हे महेश पाटील यास समजावुन सांगत असतांना त्याने फौजदार बांगर यांची कॉलर पकडून सोबतच्या पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यावेळी महेश याने, 'तुच काय तुझे पोलिस स्टेशन माझे काही वाकडे करु शकत नाही',असे म्हणत पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरवात केली. यानंतर महेश पाटील याने रागाच्या भरात त्याच्याकडे असलेला मोबाईल जमिनीवर आपटुन फोडला व फौजदार बांगर यांना तुच मोबाईल फोडला असे म्हणत वाद घालु लागला. या वादावादीत पाटील याने माझ्या गाडीत ५० हजार रुपये होते व माझ्या गळ्यातील ७ तोळ्याची सोन्याची चैन तुम्ही काढली, असे म्हणत तुमच्यावर केस करतो, अशी धमकी दिली. 

या प्रकरणी फौजदार बांगर यांच्या तक्रारीवरुन आरोपी महेश पाटील (रा. तारांगण सोसायटी, बजाजनगर) याच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक गंभीरराव हे करीत आहेत.

Web Title: Police personnel abducted in Waluj Mahanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.