Police could not find a lawyer who attacked the municipality | महापालिका पथकावर हल्ला करणारा वकील पोलिसांना सापडेना
महापालिका पथकावर हल्ला करणारा वकील पोलिसांना सापडेना

औरंगाबाद : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला अ‍ॅड. आमेर खान अन्वर खान घटनेला सात दिवस उलटल्यानंतरही पोलिसांना सापडला नाही.


याविषयी अधिक माहिती अशी की, महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक १६ जुलै रोजी दुपारी दिल्लीगेट परिसरातील सलीम अली सरोवरालगतचे अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. यावेळी आरोपी अ‍ॅड. आमेर खान आणि शेख नवीद यांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला आणि अतिक्रमण अधिकारी वामनराव कांबळे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. याविषयी कांबळे यांनी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. तेव्हापासून अ‍ॅड. आमेर गायब असून, पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नागरे यांनी दिली.


Web Title: Police could not find a lawyer who attacked the municipality
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.