वाळूज एमआयडीसीतील तोडफोड प्रकरणी उद्योजकांचे शिष्टमंडळ भेटले पोलिस आयुक्तांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:53 PM2018-08-11T15:53:38+5:302018-08-11T15:55:46+5:30

महाराष्ट्र बंद दरम्यान वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी घुसून तोडफोड केली. यासंदर्भात उद्योजकांचे एक शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले.

The police commissioners met a business delegation of Walul MIDC | वाळूज एमआयडीसीतील तोडफोड प्रकरणी उद्योजकांचे शिष्टमंडळ भेटले पोलिस आयुक्तांना

वाळूज एमआयडीसीतील तोडफोड प्रकरणी उद्योजकांचे शिष्टमंडळ भेटले पोलिस आयुक्तांना

googlenewsNext

औरंगाबाद : महाराष्ट्र बंद दरम्यान गुरुवारी (दि.९) वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये समाजकंटकांनी घुसून तोडफोड केली. यासंदर्भात उद्योजकांचे एक शिष्टमंडळ आज पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले.

मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंध नसलेल्या व हे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांना कठोर शासन व्हायला पाहिजे. त्यासाठी चौकशीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करू अशी ग्वाही उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने मानसिंग पवार यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना दिली. 

शिष्टमंडळात सुनील किर्दक, जगन्नाथ काळे, अशोक बेडसे पाटील, बालाजी शिंदे, भारत मोतींगे, अमित राजळे, राहुल घोगरे, कृष्णा गायकवाड, विजयराज शिंदे, श्री. कदम, बाबुराव खोडे, सुनील भोसले, विंग कमांडर जाधव, नारायण पवार आदींचा समावेश होता.

तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही 
वाळूज औद्योगिक वसाहतील कंपन्यांमध्ये तोडफोड करणाऱ्यांची गय करणार नाही. उद्योजकांनी कंपनीमधील सुरक्षेवर लक्ष केंद्रित करावे. तसेच यापुढे बाहेरील व्यक्तींच्या या परिसरातील प्रवाशांवर निर्बंध यावेत यासाठी पोलीस सहकार्य करतील 
- चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त  

Web Title: The police commissioners met a business delegation of Walul MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.