साजापूर चौफुली-शरणापूर रस्त्यावर खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 10:53 PM2019-11-30T22:53:04+5:302019-11-30T22:53:22+5:30

साजापूर चौफुली ते शरणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

Pits on the Sajapur Chaufuli-Sharanapur road | साजापूर चौफुली-शरणापूर रस्त्यावर खड्डे

साजापूर चौफुली-शरणापूर रस्त्यावर खड्डे

googlenewsNext

वाळूज महानगर : साजापूर चौफुली ते शरणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.


वाळूज औद्योगिक वसाहतीत ये-जा करण्यासाठी हा जवळचा मार्ग असल्यामुळे करोडी, शरणापूर, माळीवाडी, दौलताबाद, अब्दीमंडी आदी भागांतील अनेक कामगार दररोज कामासाठी ये-जा करीत असतात.

याच बरोबर उद्योगनगरीत मालाची ने-आण करणारी अनेक जडवाहनांची या रस्त्यावरुन वर्दळ असते. आजघडीला या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. या खड्ड्यांमुळे कामगारांची गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Pits on the Sajapur Chaufuli-Sharanapur road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.