खाजगी रुग्णालयासमोर रुग्ण अर्धा तास रुग्णवाहिकेतच; खाट, व्हेंटिलेटरची वाट पाहून शेवटी घाटी रुग्णालयात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 07:49 PM2020-09-10T19:49:30+5:302020-09-10T19:52:36+5:30

रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात खाट, व्हेंटिलेटर उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करीत होते.

The patient is in an ambulance for half an hour in front of a private hospital; Bed, waiting for the ventilator, finally admitted to Ghati Hospital | खाजगी रुग्णालयासमोर रुग्ण अर्धा तास रुग्णवाहिकेतच; खाट, व्हेंटिलेटरची वाट पाहून शेवटी घाटी रुग्णालयात दाखल

खाजगी रुग्णालयासमोर रुग्ण अर्धा तास रुग्णवाहिकेतच; खाट, व्हेंटिलेटरची वाट पाहून शेवटी घाटी रुग्णालयात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देएका रुग्णासाठी चौघांची धावपळ प्रत्येक जण स्वत:च्या पातळीवर प्रयत्न करीत होता.

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : वेळ बुधवारी दुपारी ३.०६ वाजेची. स्थळ- उस्मानपुऱ्यातील ओरिआॅन सिटी केअर हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागाचे प्रवेशद्वार. याठिकाणी उभ्या रुग्णवाहिकेत रुग्ण आणि त्याचे कुटुंबीय रुग्णालयात होते. जवळपास अर्ध्या तासानंतर कुटुंबीय बाहेर येतात आणि व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने घाटीत जावे लागेल, असे रुग्णवाहिकाचालकाला सांगतात. पीपीई कीट घातलेला रुग्णवाहिकाचालक क्षणाचाही विलंब न करता घाटीत पोहोचतो आणि रुग्णाला अपघात विभागात दाखल केले जाते.

ओरिआॅन सिटी केअर हॉस्पिटलसमोर ही रुग्णवाहिका अर्धा तास उभी होती. सदर रुग्ण एमआयटी रुग्णालयातून याठिकाणी आणल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. दुपारी ३ वाजेपासून रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात खाट, व्हेंटिलेटर उपलब्ध होईल, यासाठी प्रयत्न करीत होते. त्यादरम्यान दुसरीकडे रुग्णालयाबाहेर उभ्या रुग्णवाहिकेत कोण आहे, नातेवाईक कुठे गेले, अशी विचारणा सुरक्षारक्षकांनी रुग्णवाहिका चालकाकडे सुरू केली होती. रुग्णालयातील कर्मचारी येतील आणि रुग्ण दाखल होईल, या प्रतीक्षेत रुग्णवाहिकाचालक थांबला होता; परंतु कुटुंबीय बाहेर आले आणि व्हेंटिलेटर नसल्याने घाटीत जावे लागेल, मामा तुम्ही घाटीच्या अपघात विभागासमोर पोहोचा, आम्ही मागून येतो, अशी सूचना रुग्णवाहिकाचालकाला केली. 

याठिकाणाहून रुग्णवाहिका ३.३२ वाजता रवाना झाली. नातेवाईकही लगेच इतर वाहनांनी रुग्णवाहिकेच्या पाठीमागे निघाले.  अवघ्या १३ मिनिटांत म्हणजे दुपारी ३.४५ वाजता रुग्णवाहिका घाटीच्या अपघात विभागासमोर पोहोचली. येथील डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करून घेत वॉर्ड क्रमांक ११ मध्ये दाखल केले. उपचार सुरू करण्यात आले असून, हा रुग्ण आॅक्सिजनवर असल्याची माहिती घाटीतील डॉक्टरांनी दिली. व्हेंटिलेटरच उपलब्ध नसल्याने रुग्ण दाखल करून घेणे अशक्य होत असल्याचे एमआयटी रुग्णालय आणि ओरिआॅन सिटी केअर हॉस्पिटलच्या प्रशासनाने सांगितले.

एका रुग्णासाठी चौघांची धावपळ
एका रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी चौघांची धावपळ होत होती. यावेळी प्रत्येक जण स्वत:च्या पातळीवर प्रयत्न करीत होता. खाजगी रुग्णालयासमोरून घाटीकडे रवाना होताना व्हेंटिलेटर उपलब्ध झाले तर घाटीतून पुन्हा खाजगीत येऊ, असा दिलासा नातेवाईक एकमेकांना देत होते. या सगळ्यात रुग्णालाही दिलासा देण्याचे काम त्यांनी केले.

घाटीत वरिष्ठांकडून दखल
रुग्णवाहिकेत ताटकळेला रुग्ण, रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांची सुरू असलेली धावपळ ‘लोकमत’चे प्रतिनिधी  टिपत होते. रुग्ण घाटीला रवाना होताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने घाटीतील वरिष्ठ डॉक्टरांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर सदर रुग्ण अपघात विभागासमोर पोहोचताच डॉक्टरांनी रुग्णास तात्काळ दाखल करून घेतले.

Web Title: The patient is in an ambulance for half an hour in front of a private hospital; Bed, waiting for the ventilator, finally admitted to Ghati Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.