अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी लाखांत, तक्रारी केवळ १६,२८७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 02:42 PM2020-10-21T14:42:46+5:302020-10-21T14:44:56+5:30

औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या.

Out of lakhs of farmers affected by heavy rains, only 16,287 complaints | अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी लाखांत, तक्रारी केवळ १६,२८७

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकरी लाखांत, तक्रारी केवळ १६,२८७

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला२८५३ तक्रारी विमा कंपन्यांकडून मंजूर

- योगेश पायघन 

औरंगाबाद : अतिवृष्टीसह इतर कारणांनी बाधित शेतकऱ्यांचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून लाखांत व्यक्त होत असताना केवळ १६ हजार २८७ तक्रारी शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्या. त्यात औरंगाबाद ३,८३३, जालना ७,४५३, बीड ४,४८८ आॅनलाईन पूर्वसूचना प्राप्त तक्रारींचा आणि जालन्यातून ५६३ आॅफलाईन तक्रारी पीक विमा जिल्हा समितीकडे आल्या. आतापर्यंत ४९२४ तक्रारींचा सर्व्हे करण्यात आला असून, २८५३ तक्रारी विमा कंपन्यांनी मंजूर केल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.

सप्टेंबरपर्यंतच्या नुकसानीचा अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होईल, तर आॅक्टोबरचा प्राथमिक नुकसान अहवालानुसार सर्वेक्षण सुरू असल्याचे कृषी विभागाचे सहसंचालक डॉ. दिनकर जाधव यांनी सांगितले. नुकसानीच्या तीन दिवसांच्या आत तक्रार कृषी विभागाला मिळणे अपेक्षित असते.  आॅनालाईन १५ हजार ७२४ तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. तर आॅफलाईन केवळ जालना जिल्ह्यातून ५६३ तक्रारी करण्यात आल्या. जालना जिल्ह्यातून आलेल्या एकूण ८०१६ तक्रारींपैकी ३३८१ तक्रारी उशिरा, १२६६ पीक उभे नसताना, तर बीडमधील २४९ तक्रारी पीक उभे नसताना, ३४५ तक्रारी इतर कारणांनी फेटाळण्यात आल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील १९ तक्रारी नाकारल्या गेल्या. १९ आॅक्टोबरपर्यंत आलेल्या तक्रारींतून औरंगाबाद जिल्ह्यात ८४५, जालना जिल्ह्यात १४६४ तर बीड जिल्ह्यात ३७९७ अशा ६१०६ तक्रारींचे सर्वेक्षण बाकी आहे.

शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकता
या तीन जिल्ह्यांत ८ लाख ३६ हजार हेक्टर क्षेत्र सप्टेंबरअखेर प्राथमिक अंदाजानुसार ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले. त्यात १० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना नुकसानीची झळ पोहचली असताना  आलेल्या तक्रारी फक्त १६ हजार २८७ आहेत. शेतकऱ्यांकडून तक्रारींना अनुत्सुकता असताना पीक काढणीनंतरही नुकसान झाल्याची नोंद करण्यासाठी राजकीय दबाब आणला जात असल्याने फिल्ड वर्क अवघड झाल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

Web Title: Out of lakhs of farmers affected by heavy rains, only 16,287 complaints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.