ऑफलाइन मका खरेदीचा अद्यापही कागदोपत्रीच खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:34+5:302021-02-23T04:07:34+5:30

वैजापुर : भरड धान्य खरेदी योजनेतंर्गत, खरेदी केलेल्या ऑफलाइन मका खरेदीबाबत अद्यापही कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. संबंधित ...

Offline corn shopping is still a paperwork game | ऑफलाइन मका खरेदीचा अद्यापही कागदोपत्रीच खेळ

ऑफलाइन मका खरेदीचा अद्यापही कागदोपत्रीच खेळ

googlenewsNext

वैजापुर : भरड धान्य खरेदी योजनेतंर्गत, खरेदी केलेल्या ऑफलाइन मका खरेदीबाबत अद्यापही कागदी घोडे नाचविण्याचे काम सुरू आहे. संबंधित शेतकऱ्यांना मका घेऊन जाण्याचे पत्र खरेदी-विक्री संघाने दिले आहे. मात्र, आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

२०१९-२०२० या रब्बी हंगामात वैजापूर येथील केंद्रांवर शासकीय भरड धान्य खरेदी योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यात आली. मात्र खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पोर्टलदेखील बंद झाले. त्यामुळे दहा शेतकऱ्यांची ३४३ क्विंटल मका ऑफलाइन खरेदी करण्यात आली. ही मका शासनाने खरेदी करावी, अशी मागणी खरेदी-विक्री संघाने शासनाकडे केली. मात्र केंद्र सरकारने मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवून न दिल्याने ही मका संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय ९ सप्टेंबर २०२० रोजी घेतला गेला. त्यानंतर १२ सप्टेंबर २०२० व ११ डिसेंबर २०२० असे दोनवेळा जिल्हा पणन अधिकारी यांनी पत्र पाठवून खरेदी-विक्री संघाला मका संबंधित शेतकऱ्यांना परत करण्याचे आदेश दिले.

संघाच्या वतीने तीन वेळा घायगाव येथील शासकीय गोडावून किपर तथा तलाठी जितेंद्र चापानेरकर यांना पत्र पाठवून संबंधित शेतकऱ्यांना मका परत करण्याची विनंती केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांना मका मिळालेली नाही. आता पुन्हा जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा पणन अधिकारी यांनी १८ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून मका परत करण्याचे आदेश काढले आहेत. या कागदी घोडे नाचविण्याच्या नादात शेतकऱ्यांचे मात्र आर्थिक नुकसान होत आहे. सात ते आठ महिने उलटून तसेच एवढा पत्रव्यवहार होऊन ही मका परत का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

------

गैरव्यवहारास कोणाचा वरदहस्त

शेतकऱ्यांची मका सात ते आठ महिने उलटूनही परत मिळाली नाही. या घटनेस जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे. तहसीलदार गायकवाड यांनी या प्रकरणात तलाठी चापानेरकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. गोदामातून मका गायब झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना परत मिळाली नाही. खरेदी-विक्री संघाने गोदामात मका नसल्याचे पत्र पणन अधिकारी यांना दिले. मग मका गोदामात आली कशी. या गैरव्यवहारास कोणाचा वरदहस्त हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

Web Title: Offline corn shopping is still a paperwork game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.