अनिवासी भारतीय करू शकणार पोस्टल मतदान

By | Published: December 2, 2020 04:12 AM2020-12-02T04:12:38+5:302020-12-02T04:12:38+5:30

....... निवडणूक आयोगाने केली सरकारला विचारणा नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांना मतदानाची परवानगी देण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सरकारशी संपर्क ...

Non-resident Indians will be able to do postal voting | अनिवासी भारतीय करू शकणार पोस्टल मतदान

अनिवासी भारतीय करू शकणार पोस्टल मतदान

googlenewsNext

.......

निवडणूक आयोगाने केली सरकारला विचारणा

नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांना मतदानाची परवानगी देण्याच्या मागणीसाठी निवडणूक आयोगाने सरकारशी संपर्क साधला आहे. १९६१ च्या निवडणूक नियमात दुरुस्ती करीत असे करणे शक्य आहे, तसेच यासाठी संसदेची परवानगी लागणार नाही.

निवडणूक आयोगाने गत आठवड्यात विधि मंत्रालयाला सांगितले आहे की, आसाम, प. बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीतील विधानसभा निवडणुकीसाठी एनआरआयना मतदान करता यावे यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय स्वरूपात आपण तयार आहोत. इलेक्ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिमचा विस्तार करण्याचीही तयारी आयोगाने दाखविली आहे.

असे सांगितले जाते की, अंदाजे एक कोटी भारतीय लोक विदेशात राहतात. यातील ६० लाख लोक मतदानासाठी पात्र असतील. ईटीपीबीएस ही सेवा केवळ मतदारांसाठी उपलब्ध आहे. यानुसार, डाक मतपत्र इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविले जाऊ शकते आणि मेलच्या माध्यमातून परत मागविले जाऊ शकते. यापूर्वी निवडणूक आयोगाला राज्यसभा खासदार आणि उद्योजक नवीन जिंदल यांच्याकडून अशा प्रकारची विनंती करण्यात आली होती.

............

Web Title: Non-resident Indians will be able to do postal voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.