खा. जलील यांच्याकडून औरंगपुरा- बारुदगरनाला रस्त्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 06:34 PM2020-10-10T18:34:08+5:302020-10-10T18:34:56+5:30

शहराच्या मध्यभागी असलेल्या व मुख्य बाजारपेठांना जोडणारा औरंगपुरा, प्रिया मार्केट, बारुदगरनाला, सिटी चौक  या रस्त्याचे काम  मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. या कामाला  लवकरच एमआयडीसीकडून सुरूवात करण्यात येणार असून या  अनुशंगाने खा. इम्तियाज  जलील यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

MP Jalil inspects Aurangpura-Barudgarana road | खा. जलील यांच्याकडून औरंगपुरा- बारुदगरनाला रस्त्याची पाहणी

खा. जलील यांच्याकडून औरंगपुरा- बारुदगरनाला रस्त्याची पाहणी

googlenewsNext

औरंगाबाद : शहराच्या मध्यभागी असलेल्या व मुख्य बाजारपेठांना जोडणारा औरंगपुरा, प्रिया मार्केट, बारुदगरनाला, सिटी चौक  या रस्त्याचे काम  मागच्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. या कामाला  लवकरच एमआयडीसीकडून सुरूवात करण्यात येणार असून या  अनुशंगाने खा. इम्तियाज  जलील यांनी शनिवारी या रस्त्याची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

औरंगाबाद शहरातील मुख्य रस्ते तयार करण्यासाठी शासनाने १५० कोटींच्या विशेष निधीची तरतुद करुन त्यास मान्यता दिली होती. सदरील निधीतुन शहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रिटिकरण महानगरपालिका, एमआयडीसी व एमएसआरडीसी या तीन विभागांकडून करण्यात येणार आहे. १५० कोटीतुन एमआयडीसी विभागाकडे ५० कोटी निधी वर्ग करण्यात आला असुन त्या निधीतुन सदरील सिमेंट क्राँक्रिट रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.

रस्त्याच्या कामासाठी मार्किंग केल्यानंतर अतिक्रमण काढण्यात येणार असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खासदार जलील यांनी केले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आठ दिवसात पाऊस थांबणार असून त्यानंतर अडथळा निर्माण करणारे विद्युत पोल व वाहिन्या महावितरणकडून हटविण्याच्या कामास सुरुवात होईल, असे ते म्हणाले.

रस्त्याच्या कामांची गुणवत्ता व दर्जा तपासण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात येणार असून विशेष पथकाला जर कोणत्याही रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आढळले, तर संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन निधीची वसुली करण्यात येईल, असेही जलील यांनी स्पष्ट केले.

Web Title: MP Jalil inspects Aurangpura-Barudgarana road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.