Movement of employees of the garbage collection company | कचरा संकलन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन
कचरा संकलन कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन

ठळक मुद्देदुसºया दिवशीही काम बंद : मनपा प्रशासन त्रस्त

औरंगाबाद : शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे काम करणाºया बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारासाठी आंदोलन केले. हे आंदोलन थांबत नाही तर दुसºया दिवशी म्हणजेच मंगळवारी पुन्हा तीन झोनमधील कंपनीच्या कामगारांनी पगारासाठी आंदोलन छेडले. त्यामुळे मनपा प्रशासन त्रस्त झाले आहे.
घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, संकलित कचरा नियोजित प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचविण्याचे काम मनपाने बंगळुरूच्या पी.गोपीनाथ रेड्डी या कंपनीला दिले आहे. फेबु्रवारीपासून कंपनीने शहरात कचरा संकलन सुरू केले असून, सध्या सहा झोनमध्ये कंपनीकडून काम केले जात आहे. कंपनीने दोन महिन्यांचा पगार न दिल्याने कामगार हवालदिल झाले आहेत. दोन महिन्यांपासून पगार नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंपनीने थकीत वेतन द्यावे, यासाठी कामगारांना आंदोलन करावे लागत आहे. सोमवारी झोन ३ मधील कामगारांनी कामबंद आंदोलन केले होते. मंगळवारी पुन्हा झोन क्रमांक २, ७ आणि ९ मधील कंपनीच्या सफाई कामगारांनी भाजपप्रणीत बहुजन कामगार शक्ती महासंघाच्या नेतृत्वाखाली सकाळपासूनच कामबंद आंदोलन केले. ६ पैकी ३ झोनमध्ये कचरा उचलण्याचे काम बंद झाल्याची माहिती समजताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी रमानगर येथील केंद्रावर धाव घेत कामगारांची समजूत काढली. वेतन थकल्याने कामगार ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. महापौरांनी लेखाधिकारी महावीर पाटणी आणि घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना बोलावून दोन दिवसांत कामगारांचे वेतन करण्याचे निर्देश दिले. अखेर कामगारांनीही आंदोलन मागे घेतले. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास कचरा संकलनाच्या कामाला सुरुवात झाली; परंतु झोन क्रमांक दोनचे काम दिवसभर ठप्पच होते.


Web Title:  Movement of employees of the garbage collection company
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.