नाना पटोलेंवर राष्ट्रवादीची सौम्य भूमिका; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 07:34 PM2021-07-12T19:34:47+5:302021-07-12T19:37:08+5:30

Nana Patole News : आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती.

The mild role of the NCP on Nana Patole; Home Minister Dilip Walse Patil said ... | नाना पटोलेंवर राष्ट्रवादीची सौम्य भूमिका; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले...

नाना पटोलेंवर राष्ट्रवादीची सौम्य भूमिका; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देनाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केलेला मुद्दा ते भाजपत खासदार असतानाचा त्यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही.

औरंगाबाद : महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याच्या विधानाने सुरु झाली आहे. मात्र, त्यांच्या या विधानावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही असे पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले. (  Home Minister Dilip Walse Patil on Nana Patole ) 

आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. यापूर्वी ही नाना पटोले यांनी कॉंग्रेसचे स्वबळ आणि मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली होती. यामुळे पाळत ठेवण्याच्या त्यांच्या विधानाने महाविकास आघाडीत ठिणगी पडली असल्याची चर्चा सुरु झाल्या. पटोले यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे औरंगाबाद येथे आले असता त्यांना पत्रकार परिषदेत पटोले यांनी केलेल्या विधानावरून महाविकास आघाडीत धुसपूस सुरु आहे का ? असा  प्रश्न विचारण्यात आला. यावर वळसे पाटील यांनी, ' नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केलेला मुद्दा ते भाजपत खासदार असताना त्यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आहे. या संदर्भात चौकशी करण्यासाठी कोणाकोणावर पाळत ठेवली आणि का ? यावर एक समिती नेमली आहे. त्यांनी कुठेही पोलीस त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचे म्हटले नाही.' असे उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराने राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाना पटोले यांच्या विधानावर जास्त प्रतिक्रिया न देता सौम्य भूमिका घेतली असल्याचे संकेत मिळत आहेत. 

यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना नाना पटोले यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या व्यक्तव्यावर प्रश्न विचारला होता. यावर 'नाना पटोले यांच्यासारख्या लहान माणसाच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी पटोले यांना टोला लगावला होता. यानंतर आज दिलीप वळसे पाटील यांनी पटोले यांच्यावर जास्त न बोलता घेतलेली सौम्य भूमिका कदाचित त्यांना जास्त महत्व न देण्याबाबत असू शकते असा तर्क राजकीय विश्लेषकांनी काढला आहे. दरम्यान, आपल्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप केल्यानंतर निर्माण झालेल्या वादाबाबत स्पष्टीकरण देताना नाना पटोले म्हणाले की, सध्या आमच्याविरोधात काल्पनिक कहाण्या रचण्याचे काम सुरू आहे. मी पुण्यात असताना काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तेव्हा मी म्हणालो होतो की, राज्यात काँग्रेसला मिळत असलेल्या प्रतिसादामध्ये वाढ झाली आहे. आमचे दौरे सुरू आहेत. त्याचा अहवाल रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. तसेच राज्य सरकारसोबतच असा अहवाल केंद्र सरकारकडेही जात असतो. प्रत्येत घडामोडीची माहिती राज्य आणि केंद्र सरकारला मिळत असते. प्रत्येक जिल्ह्याची, विभागाची माहिती सरकारला मिळत असते. तशीच माझी आणि पक्षाच्या इतर नेत्यांची माहितीही दिली जात असते, ही प्रक्रिया मी कार्यकर्त्यांना समजावून सांगत होतो. मात्र माझ्या वक्तव्याचा चुकीचा उल्लेख काढला गेला, असे स्प्ष्टीकरण दिले आहे. 

Web Title: The mild role of the NCP on Nana Patole; Home Minister Dilip Walse Patil said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.