राष्ट्रीय महामार्ग-संघर्ष समितीची बैठक संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:06 AM2021-03-09T04:06:43+5:302021-03-09T04:06:43+5:30

कन्नड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनात सोमवारी राष्ट्रीय महामार्ग व औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे संघर्ष समितीची संयुक्त ...

Meeting of National Highways-Struggle Committee concluded | राष्ट्रीय महामार्ग-संघर्ष समितीची बैठक संपन्न

राष्ट्रीय महामार्ग-संघर्ष समितीची बैठक संपन्न

googlenewsNext

कन्नड : विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या दालनात सोमवारी राष्ट्रीय महामार्ग व औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे संघर्ष समितीची संयुक्त बैठक पार पडली. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्यांचा पाढा वाचल्यानंतर आयुक्त केंद्रेकरांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दहा दिवसात प्रत्यक्ष दौरा करून समस्या सोडवाव्या, अशा सूचना दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा वनाधिकारी विजय सातपुते, उपवनसंरक्षक राजेंद्र काळे, संघर्ष समितीचे डॉ. अण्णासाहेब शिंदे, अशोक दाबके, राष्ट्रीय महामार्गाचे महाव्यवस्थापक तथा प्रकल्प संचालक अरविंद काळे, कार्यकारी अभियंता महेश पाटील यांची उपस्थिती होती.

संघर्ष समितीचे डॉ. अण्णासाहेब शिंदे म्हणाले की, कन्नड घाटातील बोगद्याचे काम तत्काळ सुरू करावे. राष्ट्रीय महामार्गाच्या सोबतच प्रस्तावित औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे लाइनच्या कामास मंजुरी मिळावी, तसेच राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना गल्ले बोरगाव-देवगाव राज्य मार्ग ३९, कन्नड-वैजापूर राज्य मार्ग ५२, प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या बोरगाव-टाकली, कन्नड-अंधानेर या अपघातस्थळावरील क्रॉसिंगवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग बनवावा, असे सुचविले. यावेळेस प्रकल्प संचालक यांनी बोगद्याच्या कामास सद्यस्थितीत निधी नसल्यामुळे पर्यायी मार्गाची चाचपणी करत आहोत, असे सांगितले. विभागीय आयुक्तांनी टनेलपर्यंत हायवे झालेला आहे. त्यामुळे निधीसाठी शिफारस करावी, अशी सूचना प्राधिकरणाला दिली. अपघातग्रस्त स्थळावर आपण प्रत्यक्ष पाहणी करावी, असे सूचविले. संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना या पाहणीत समावेश करावा, असे सांगितले.

Web Title: Meeting of National Highways-Struggle Committee concluded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.