भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 04:19 PM2018-03-29T16:19:34+5:302018-03-29T17:08:43+5:30

‘ महावीर का क्या संदेश ‘जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने भव्य शोभायात्रा काढली. उल्लेखनीय म्हणजे, जैन समाजच नव्हे तर अन्य समाज बांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले.

The magnificent Shobha Yatra in Aurangabad, on the occasion of Lord Mahavir's birth anniversary | भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा 

भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबादेत भव्य शोभायात्रा 

औरंगाबाद : ‘ महावीर का क्या संदेश ‘जिओ और जीने दो’ असा विश्वशांतीचा उद्घोष करीत औरंगाबादेत सकल जैन समाजाने भव्य शोभायात्रा काढली. उल्लेखनीय म्हणजे, जैन समाजच नव्हे तर अन्य समाज बांधवांनी तेवढ्याच उत्साहात या शोभायात्रेत सहभागी होऊन एकात्मतेचे दर्शन घडविले. भारताच्या विकासात जैन समाजाचे योगदान यावर आधारित देखाव्यांनी सर्वांचे लक्षवेधून घेतले. शोभायात्रेतून भक्ती-शक्ती-शिस्त- स्वच्छता- सेवाभाव-दानशूरपणा याचा नवा आदर्श सर्वांसमोर निर्माण केला. हेच या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे फलित ठरले. 

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या दिवशी सकल जैन समाजा भव्य शोभायात्रा काढणाऱ्या औरंगाबादची ख्याती संपूर्ण देशभर पसरली आहे. ही शोभायात्रा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातील लोक शहरात येत असतात. साधु-संताच्या उपस्थितीने समाजबांधवांच आनंद द्विगुणित झाला होता. ‘प्रेम से बोलो जय महावीर, ‘ मिलकर बोलो जय महावीर’, ‘ एक दो तीन चार जैनधर्मकी जयजयकार’ असा जयघोष करीत प्रचंड उत्साहात शोभायात्रा निघाली होती. सुमारे तीन तास नॉनस्टॉप जल्लोष, चैतन्य सर्वांनी अनुभवले. 

सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध भागातून युवकांनी वाहन रॅली काढली होती. सर्व वाहन रॅली महावीर उड्डाणपुल चौकात पोहोचल्या. यानंतर ७.१५ वाजता महावीर स्तंभ येथे, यानंतर ७.३० वाजता उस्मानपुरा येथील उत्तमचंद ठोले दिगंबर जैन छात्रालय येथे व त्यानंतर गुरुगणेशनगर येथे धर्मध्वजारोहण सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते झाले. यावेळी आ. सुभाष झांबड, प्रशांत देसरडा, महावीर पाटणी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विनोद बोकडिया व सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

पैठणगेट येथून मुख्य शोभायात्रेला सकाळी ९.३० वाजता सुरुवात झाली. यावेळी आचार्य कुशाग्रनंदीजी म.सा.,नविनसागरजी म.सा., मुनिश्री आगमसागरजी म.सा., पुनितसागरजी म.सा., सहजसागरजी म.सा. आदी साधू-संतांनी सहभागी होऊन सर्वांचा उत्साह वाढविला. आचार्यजींनी सर्वांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद दिला. यानंतर ढोल-ताशाच्यानिनादात शोभायात्रेला सुरुवात झाली. देशाच्या विकासात जैन समाजाचे योगदान तसेच धार्मिक व सामाजिक विषयावरील ४० देखाव्यांनी यावेळी सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. टिळकपथ, गुलमंडी, मछलीखडक, सिटीचौक, सराफा रोड, शहागंजमार्गे शोभायात्रा राजाबाजारात पोहोचली. औरंगपुऱ्यातील स.भु. मैदानावर महाप्रसादी, रक्तदानशिबीर, वृक्षवाटप आदी कार्यक्रम पार पडले.

शोभायात्रेत जैन समाजच नव्हे तर अन्य समाजाचे बांधवही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. खा. चंद्रकांत खैरे, आ. अतुल सावे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, माजी आमदार किशनचंद तनवाणी, प्रदिप जैस्वाल, कल्याण काळे,  अंबादास दानवे, नामदेव पवार, जी.एस.अन्सारी,  राजू तनवाणी, समीर राजूरकर, सुरेंद्र कुलकर्णी, दयाराम बसय्ये, हुशारसिंग चव्हाण, जयश्री वाडकर, अनिल मकरिये, बबन डिडोरे. मनिषा भन्साळी तसेच सकल जैन समाजाचे जी.एम.बोथरा, ललीत पाटणी, प्रकाश बाफना, डॉ.शांतीलाल संचेती, डॉ.अनिल नहार, सुधीर साहुजी, दिंगबर क्षीरसागर, वृषभ कासलीवाल, मदनलाल आच्छा, चांदमल सुराणा,जिनदास मोगले, रवी मुगदिया, संजय संचेती, विलास साहुजी, डॉ.प्रकाश झांबड, तनसुख झांबड, अ‍ॅड.डी.बी.कासलीवाल, चंदनमल पगारिया,अशोक अजमेरा, दिलीप मुगदिया, जव्हेरचंद डोसी, नरेंद्र गेलडा, संजय सेठीया, संजय साहुजी,  महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे  मुकेश साहुजी, भारती बागरेचा, अनिलकुमार संचेती, करूणा साहुजी, रमेश घोडके, भावना सेठिया, मिठालाल कांकरिया, राजेश मुथा, मंगला गोसावी, निलेश पहाडे, मधू जैन, मंजु पाटणी, विकास रायमाने, संतोष पापडीवाल, संजय सुराणा, मनोज छाबडा, निलेश सावलकर, रवी लोढा, निलेश जैन, अमृतलाल साहुजी, राजेंद्र पगारिया, नरेंद्र अजमेरा, सुनील वायकोस, कुंतीलाल हरिण, पंकज साकला, अंकुर साहुजी, अजीत जैन, राहुल जोगी, प्रविण भंडारी, कल्पेश गांधी, संतोष संचेती, सुनिल बोरा. महिला समितच्या अध्यक्षा मंगल पारख, कविता अजमेरा, मिना पापडीवाल, वासंती काळे, सुनिता सेठिया, स्मिता संचेती, पुष्पा बाफना, पल्लवी शहा, निता ठोले आदी समाजबांधवांची उपस्थिती होती. 

Web Title: The magnificent Shobha Yatra in Aurangabad, on the occasion of Lord Mahavir's birth anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.