पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:38 PM2019-09-07T23:38:54+5:302019-09-07T23:39:05+5:30

बजाजनगरातील थरारक घटना

Knockout on young men from the East | पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला

googlenewsNext

वाळूज महानगर : पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बजाजनगरात घडली. या घटनेत राजू हरिभाऊ दहातोंडे (रा. वडगाव कोल्हाटी) हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले आहेत.


राजू दहातोंडे यास शनिवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास एका मित्राने मोबाईलवर संपर्क साधून बजाजनगरातील कोलगेट चौकात बोलावून घेतले. राजू काही वेळातच कोलगेट चौकात पोहचला. तेथे पोहोचल्यावर काही तरुणांनी राजूसोबत जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद उकरुन काढला.

यातून वाद विकोपाला गेल्याने तरुणांनी राजुला मारहाण करायला सुरुवात केली. यातील एका तरुणाने राजूवर चाकूहल्ला केला. यात त्याच्या पाठीवर व पोटात खोलवर वार झाल्याने रक्तस्त्राव सुरु झाला.

तो जमिनीवर कोसळताच हल्लेखोर पसार झाले. बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात त्याच्या उपचार करुन त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलीसांनी शासकीय रुग्णालयात जाऊन घटनेची माहिती घेतली. हल्लेखोरांची नावे समजू शकली नाहीत. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

Web Title: Knockout on young men from the East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.