जिवावर उठतेय पतंगबाजी; मांजामुळे दरवर्षी २०० पेक्षाही अधिक पक्ष्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 06:24 PM2021-01-06T18:24:57+5:302021-01-06T18:25:51+5:30

Nylon Manjha नायलॉन मांजाची पतंगबाजी अनेक पक्षी आणि प्राण्यांच्या जिवावर उठली आहे.

Kite flying; Nylon Manjha kill more than 200 birds each year | जिवावर उठतेय पतंगबाजी; मांजामुळे दरवर्षी २०० पेक्षाही अधिक पक्ष्यांचा मृत्यू

जिवावर उठतेय पतंगबाजी; मांजामुळे दरवर्षी २०० पेक्षाही अधिक पक्ष्यांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देसाधा दोरा वापरून पतंगबाजीचा आनंद लुटापंख छाटले गेल्याने उडणे होते कायमचे बंद

औरंगाबाद : नायलॉन मांजाच्या मदतीने प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापून ‘काटे......’ असा जोरात जल्लोष करणे खूप आनंददायी असते; पण त्याचवेळी कळत-नकळतपणे अनेक मुके जीव जखमी होतात, याचे अनेकांना भानही नसते. मांजात अडकून दरवर्षी २०० पेक्षाही अधिक पक्ष्यांना आणि प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे.

नायलॉन मांजाची पतंगबाजी अनेक पक्षी आणि प्राण्यांच्या जिवावर उठली आहे. त्यामुळेच साधा दोरा वापरून पतंगबाजीचा आनंद लुटा, असे आवाहन पोलीस आयुक्तांप्रमाणेच अनेक पक्षीमित्र आणि पर्यावरणप्रेमींकडून केले जात आहे. मांजामध्ये अडकून उपचारासाठी आणल्या जाणाऱ्या जखमी पक्ष्यांमध्ये कावळा, कोकिळा, भारद्वाज, घार, कबुतर या पक्ष्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. याचे एकमेव कारण म्हणजे मोठ्या आकारामुळे या पक्ष्यांची धडपड कुणाला तरी चटकन दिसते आणि त्यांना उपचारासाठी आणले जाते.

केवळ संक्रांतीच्या काळातच नव्हे, तर वर्षभर मांजामुळे अडकून जायबंदी होणाऱ्या पक्ष्यांचे सत्र सुरू असते. नायलॉन मांजाला काचेची पुड लावण्यात येत असल्याने त्याची धार वर्षानुवर्षे कमी होत नाही. त्यामुळे वर्षभर अशा घटना सुरूच असतात, फक्त संक्रांतीच्या काळात त्याचे प्रमाण वाढलेले असते, असे पक्षीमित्रांनी सांगितले.

पंख छाटले गेल्याने उडणे होते कायमचे बंद
मांजामुळे फुलपाखरे, सरडे, खार यांनाही जीव गमवावा लागतो. उपचारासाठी जे पक्षी आणले जातात, त्यांच्यापैकी ६० टक्के पक्षी पुन्हा चांगले होतात; परंतु उर्वरित पक्ष्यांना गंभीर इजा झाल्यामुळे जीव गमवावा लागतो. मांजामुळे ज्या पक्ष्यांचे पंख छाटले जातात, त्यांचे उडणे कायमचे बंद होते आणि ते काही दिवसांतच कुणा अन्य प्राण्यांचे भक्ष्य ठरतात.

अनेक पक्षी गमवतात जीव 
संक्रांतीच्या आधी आणि नंतरचे ४-५ दिवस मांजामुळे जखमी होणारे पक्षी मोठ्या प्रमाणात सापडतात. उंच झाडावर कुठे तरी मांजा अडकलेला असतो. त्यामुळे त्या मांजात अडकणारा पक्षी जर आकाराने मोठा असेल तर तो इतरांना दिसतो आणि त्याची त्यापासून सुटका केली जाते; पण आकाराने लहान असणारे पक्षी मात्र सहजासहजी कुणाला दिसतही नाहीत आणि त्यांची ताकदही कमी पडते, त्यामुळे त्यांना लगेचच जीव गमवावा लागतो. दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या पक्ष्यांपैकी ८० टक्के पक्षी हे मांजामुळे जखमी झालेले असतात.
- डॉ. किशोर पाठक, पक्षीमित्र

Web Title: Kite flying; Nylon Manjha kill more than 200 birds each year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.