ज्योती, दिनकर यांनी जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 12:46 AM2018-12-17T00:46:45+5:302018-12-17T00:50:10+5:30

औरंगाबाद : अंगाला झोंबणाऱ्या गारव्यावर मात करणारा ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा थरार अन् आतषबाजी, पाच वर्षाच्या नातवापासून पंचाहत्तरी पार केलेल्या ...

Jyoti, Dinkar win Aurangabad Mahamarethan | ज्योती, दिनकर यांनी जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन

ज्योती, दिनकर यांनी जिंकली औरंगाबाद महामॅरेथॉन

googlenewsNext
ठळक मुद्देधावपटूंची विक्रमी गर्दी : हजारो स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग, दिव्यांग, लष्करी जवान आणि परदेशातील धावपटूही धावले

औरंगाबाद : अंगाला झोंबणाऱ्या गारव्यावर मात करणारा ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा थरार अन् आतषबाजी, पाच वर्षाच्या नातवापासून पंचाहत्तरी पार केलेल्या आजी-आजोबांचा गगनाला गवसणी घालणारा उत्साह, तरूण- तरूणी, विद्यार्थी, दिव्यांगांसह, लष्करी जवान आणि परदेशातून आलेल्या धावपटूंच्या उत्स्फूर्त सहभागाला औरंगाबादकर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून दिलेला अपूर्व नजराणा, त्याच तोलामोलाचे व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेले भव्यदिव्य नियोजन. या उमद्या वातावरणात रविवारी विभागीय क्रीडा संकुलात पार पडलेली लोकमत समूह आयोजित खुल्या गटातील २१ कि.मी.ची विन्टोजिनो प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉन परभणीच्या ज्योती गवते आणि नाशिकच्या दिनकर महाले यांनी जिंकली.
पहाटे वॉर्मअपनंतर धावण्यास सिद्ध झालेल्या २१ कि.मी. खुल्या गटातील धावपटूंना महापौर नंदकुमार घोडेले, लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, लोकमत समूहाचे कार्यकारी संचालक करण दर्डा, महामॅरेथॉनच्या संचालिका रुचिरा दर्डा, विन्टोजिनोचे कालिदास येळीकर, उन्मेष टाकळकर, मेटारोलचे आशिष भाला, प्राईड ग्रुपचे संचालक नितीन बगाडिया, सॅफरॉन ग्रुपचे पार्टनर अनिल मुनोत, गायकवाड क्लासेसचे रामदास गायकवाड आदी मान्यवरांनी सकाळी सहा वाजता झेंडी दाखविली अन् आतषबाजी झाली. त्यानंतर औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये मराठवाड्याची दिग्गज खेळाडू ज्योती गवते हिने अपेक्षेप्रमाणे महिलांच्या खुल्या गटात वर्चस्व राखले. ज्योती गवते हिने प्रारंभापासूनच वेगवान सुरुवात केली आणि प्रतिस्पर्ध्याला पिछाडीवर टाकत २१ कि.मी. अंतराची महामॅरेथॉन १ तास १९ मिनिटे ४१ सेकंदांत जिंकली. नाशिकच्या श्रुती पांडे हिने दुसरे स्थान पटकावले. पुरुषांच्या खुल्या गटात दिनकर महाले या नाशिकच्या धावपटूने १ तास १२ मिनिटे २६ सेकंद, अशी वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. किशोर जाधव द्वितीय व नीरज कुमार तिसºया स्थानी आला.

महामॅरेथॉनचे निकाल
२१ कि.मी. निकाल (पुरुष खुला गट) : १. दिनकर महाले (१ तास १२ मि. २६ सेकंद), २. किशोर जाधव (१ तास १३ मि. २५ सेकंद), ३. नीरज कुमार (१ तास १३ मि. ५१ सेकंद).
महिला (खुला गट) : १. ज्योती गवते (१ तास १९ मि. ४१ सेकंद). २. श्रुती पांडे (१ तास ४८ मि. ३९ सेकंद).
डिफेन्स गट (पुरुष) : १. गुरजित सिंग (१ तास ९ मि. २ सेकंद), २. पुकेश्वर लाल (१ तास ९ मि. ५६ सेकंद), ३. सुनील कुमार (१ तास १४ मि. ६ सेकंद). महिला : १. अश्विनी देवरे (१ तास ५४ मि. २९ सेकंद), ३. प्रतिभा पांडुरंग के. (२ तास १२ मि. ३६ सेकंद).
ज्येष्ठ गट (पुरुष) : १. पांडुरंग पाटील (१ तास २४ मि. ४८ सेकंद), २. अनिल टोकरे (१ तास २६ मि. ४९ सेकंद), ३. हरीश चंद्रा (१ तास २७ मि. ५४ सेकंद). महिला : १. शोभा देसाई (१ तास ४९ मि. २७ सेकंद), २. शोभा यादव (१ तास ५२ मि. ४४ सेकंद), ३. अमृता.
१० कि.मी. खुला गट
(पुरुष) : १. किरण म्हात्रे (३१ मि. ५५ सेकंद), २. राहुल कुमार राजभर (३२ मि. ८ सेकंद), ३. शिवाजी पालवे (३३ मि. ३४ सेकंद). महिला : १. कोमल जाधव (३९ मि.२२ सेकंद), २. पूजा श्रीडोळे (४२ मि. ८ सेकंद), ३. अश्विनी काटोळे (४२ मि. ५५ सेकंद).
ज्येष्ठ पुरुष : १. रवी कळसी, २. भिकू खैरनार, ३. रमेश चिवलीकर. महिला : १. विद्या धापोडकर, २. विठाबाई कच्छवे, ३. सविता शास्त्री.
परदेशी गट (पुरुष) : १. सायमन टू, २. पीटर एमवांग्वी. महिला : १. बिर्तुकन नेगश, २. झेनेश बेकेले.

लक्षवेधी
मराठवाड्याची स्टार धावपटू ज्योती गवते ही ‘लोकमत’च्या उपक्रमात दुसºयांदा अजिंक्य ठरली. याआधी तिने २0१६ मध्येही विजेतेपद पटकावले होते. गतवर्षी काही कारणांमुळे ती सहभागी होऊ शकली नव्हती.
औरंगाबादची विठाबाई कच्छवे, उदगीरची पूजा श्रीडोळे आणि नाशिकची श्रुती पांडे यांनी नाशिकपाठोपाठ औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये मेडल जिंकत सलग पदकांचा डबल धमाका केला.
विठाबाई कच्छवे यांनी नाशिकच्या कामगिरीची पुनरावृत्ती करीत औरंगाबाद येथेही १० कि.मी. अंतरात ज्येष्ठांच्या गटात दुसरे स्थान पटकावले. उदगीरच्या पूजा श्रीडोळे हिने नाशिकला प्रथम क्रमांक पटकावला होता.
कोल्हापूरच्या प्रसाद जाधव यांनी औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये सहभागी होताना सर्किट रन पूर्ण केले. गतवर्षी ते कोल्हापूर व नागपूरला सहभागी झाले. यावर्षी ते नाशिक व औरंगाबाद महामॅरेथॉनमध्ये धावले. सर्किट रनची संकल्पनेमुळे पूर्ण महाराष्ट्राची संस्कृती समजण्याची संधी धावपटूंना मिळत आहे, असे ते म्हणाले.

६ जानेवारीला कोल्हापूर..!
नाशिक व औरंगाबाद येथे मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता महाराष्ट्रातील धावपटूंना कोल्हापूर येथे ६ जानेवारी रोजी होणाºया महामॅरेथॉनची प्रतीक्षा आहे. कोल्हापूरनंतर
नागपूर ३ फेब्रुवारी रोजी,
पुणे १७ फेब्रुवारी रोजी महामॅरेथॉन होत आहे. यासाठी नोंदणी सुरु झाली आहे.

लोकमत समूहातर्फे आयोजित या महामॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी पोषक वातावरण होते. त्याचप्रमाणे याआधीच्या तुलनेत धावनमार्गही चांगला होता. गतवेळेसच्या तुलनेत यंदा आपल्या वेळेत सुधारणा झाल्याचे समाधान वाटते. विजेतेपद पटकावणे हे आपल्याला अपेक्षितच होते. - ज्योती गवते
(२१ कि.मी. अंतरातील चॅम्पियन)

आज महामॅरेथॉनमध्ये मी खूप पाठीमागे होतो. माझ्यापेक्षा दोन प्रतिस्पर्धी जवळपास ३०० मीटर पुढे होते; परंतु जोरदार मुसंडी मारून मी ही शर्यत जिंकली. आता नागपूर महामॅरेथॉन गाजवायची हे माझे ध्येय आहे. - दिनकर महाले
(२१ कि.मी. अंतरातील विजेता)

Web Title: Jyoti, Dinkar win Aurangabad Mahamarethan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.