जेवणाची भ्रांत, मग हप्ते कसे भरणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:05 AM2021-05-16T04:05:51+5:302021-05-16T04:05:51+5:30

आम्ही गाड्यांचे हप्ते भरू शकत नाही. हप्ते थकले म्हणून कर्ज वितरित करणाऱ्या खासगी कंपन्या, बँका दमदाटी करून आमच्या ...

The illusion of a meal, then how to pay the installments? | जेवणाची भ्रांत, मग हप्ते कसे भरणार ?

जेवणाची भ्रांत, मग हप्ते कसे भरणार ?

googlenewsNext

आम्ही गाड्यांचे हप्ते भरू शकत नाही. हप्ते थकले म्हणून कर्ज वितरित करणाऱ्या खासगी कंपन्या, बँका दमदाटी करून आमच्या गाड्या उचलून नेत आहेत. आमची परिस्थिती लक्षात घ्या आणि जोपर्यंत सर्वकाही सुरळीत होत नाही, तोपर्यंत आमचे हप्ते थांबवा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली.

टॅक्सीचालक सुरेश सूर्यवंशी म्हणाले की, हप्ते भरता न येणे, हा आमचा नाईलाज आहे. त्यामुळे आमच्या गाड्यांवर जप्ती आणणे एकवेळ समजले, पण घरी कुणी नसताना किंवा आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता आमच्या गाड्या उचलून नेण्याचा प्रकार काही कर्ज वितरित करणाऱ्या खासगी कंपन्यांनी सुरू केला आहे, तो थांबविण्यात यावा.

चौकट :

दमदाटी करून गाड्या उचलून नेणाऱ्या एजंटांवर आणि खासगी कंपन्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती पोलीस आयुक्तांना करू. याकाळात अशी गुंडागर्दी करणे योग्य नाही. आजवर या लाेकांनी नियमित कर्ज भरले आहे आणि यापुढेही परिस्थिती निवळल्यावर ते कर्ज भरतील, असे आपण संबंधित कंपनीच्या वरिष्ठांशीही बोलू, असे खासदार इम्तियाज जलील यांनी टॅक्सीचालकांना सांगितले.

फोटो ओळ :

खासदार इम्तियाज जलील यांना निवेदन देताना टॅक्सीचालक.

Web Title: The illusion of a meal, then how to pay the installments?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.