हापूस आंबे खाल्ले, विकलेही; पैसे मागताच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 07:12 PM2021-09-23T19:12:32+5:302021-09-23T19:15:55+5:30

crime in Aurangabad : अधिकाऱ्याने हापूस आंब्याचा व्यवसाय करायचा असून, या व्यवसायासाठी हापूस आंबे मिळवून देण्याची मागणी केली.

Hapus mangoes ate , even sold; The district sports officer beat him up while asking for money | हापूस आंबे खाल्ले, विकलेही; पैसे मागताच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने केली मारहाण

हापूस आंबे खाल्ले, विकलेही; पैसे मागताच जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याने केली मारहाण

googlenewsNext
ठळक मुद्देविभागीय क्रीडा संकुलातील घटना आंबा खरेदीचे पैसे मागितल्याचा आला राग

औरंगाबाद : खरेदी केलेल्या आंब्याचे २ लाख ५८ हजार रुपये मागण्यासाठी रत्नागिरीहून औरंगाबादेत आलेल्या एका महिलेला जिल्हा क्रीडा अधिकारी कविता सुभाष नावंदे यांनी विभागीय क्रीडा संकुलात मारहाण केल्याची घटना सोमवारी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणात नावंदे यांच्या विरोधात जवाहरनगर ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान, नावंदे यांच्या तक्रारीवरून रत्नागिरीतील दोघींच्या विरोधात अदलखपात्र गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यातील फिर्यादी सुप्रिया बाळासाहेब पवार (वय २७, रा. कुँवारबाव, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये कविता नावंदे या रत्नागिरी येथे क्रीडा अधिकारी होत्या. त्यावेळी फिर्यादी १२ वीच्या वर्गात शिकत होत्या. खेळाच्या माध्यमातून दोघींची ओळख झाली. मार्च २०२० मध्ये नावंदे यांनी फोनद्वारे पवार यांना हापूस आंब्याचा व्यवसाय करायचा असून, या व्यवसायासाठी हापूस आंबे मिळवून देण्याची मागणी केली. यानुसार पवार यांनी परिसरातील इतरांकडून ३०० हापूस आंब्यांच्या पेट्या नावंदे यांच्याकडे पाठविल्या. या व्यवहारातील काही पैसे दिल्यानंतर उर्वरित २ लाख ५८ हजार रुपये त्या देत नव्हत्या. तसेच मोबाइल फोनही उचलत नसल्यामुळे बहिणीला सोबत घेऊन औरंगाबादेत सोमवारी आले असल्याचे पवार यांनी सांगितले. 

हेही वाचा - बिबी-का-मकबरा परिसरात दडले काय ? उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा

नावंदे यांच्या विभागीय क्रीडा संकुलातील कार्यालयात सायंकाळी साडेपाच वाजता आल्यानंतर आंब्याचे पैसे मागितले. तेव्हा नावंदे यांनी पवार यांना 'माझा तुझा काही संबंध नाही. मी तुला ओळखतही नाही', असे सांगितले. तसेच चापटाने मारहाण करीत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यावरून अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. दरम्यान कविता नावंदे यांनीही सुप्रिया पवार व त्यांच्या बहिणीच्या विरोधात तक्रार दाखल केली. यावरून शिवीगाळ, धमकी देण्याचा अदखलपात्र गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलीस अधिकारी वाघ यांनी दिली.

हेही वाचा - स्वस्त इंधनाकडे वाढता कल; सीएनजी कारसाठी औरंगाबादकर वेटिंगवर

Web Title: Hapus mangoes ate , even sold; The district sports officer beat him up while asking for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.