Give the father on time to visit the boy | मुलाला भेटण्यासाठी जाणाऱ्या पित्यावर काळाचा घाला
मुलाला भेटण्यासाठी जाणाऱ्या पित्यावर काळाचा घाला

वाळूज महानगर : आश्रम शाळेत शिकायला असलेल्या मुलाला भेटण्यासाठी दुचाकीने जाणाºया पित्याला भरधाव ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, सुभाष छगन पवार (४१, रा. वडगाव कोल्हाटी) असे मृत पित्याचे नाव आहे. ही घटना रविवारी पाटोदा-वाल्मी रस्त्यावर घडली.


सुभाष पवार हे वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करतात. त्यांचा मुलगा बोकुड जळगाव येथील आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिकत आहे. पवार हे रविवारी सुटी असल्याने वडगाव कोल्हाटी येथून दुचाकीने (एमएच- २०, एएक्स- ६५४१) मुलाला भेटण्यासाठी सकाळी बोकुड जळगावला निघाले.

पाटोदा-वाल्मी रस्त्याने जात असताना गंगापूर नेहरी गावालगत असलेल्या पुलाजवळील वळण रस्त्यावर पाठीमागून भरधाव ट्रकने (एमएच-०४, सीजी- ४९०८) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. पवार यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी तपासून पवार यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


Web Title: Give the father on time to visit the boy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.