बच्चू भाऊंचे हळवे रूप ! शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये रमले; बरोबर उत्तर देणाऱ्यास बक्षीसही दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 07:16 PM2021-02-06T19:16:54+5:302021-02-06T19:18:29+5:30

विद्यार्थी कमी का बोलतात, याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या.

Gentle look of Minister Bachchu Kadu ! Visited the school and played among the students; He also gave a reward to the one who answered correctly | बच्चू भाऊंचे हळवे रूप ! शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये रमले; बरोबर उत्तर देणाऱ्यास बक्षीसही दिले

बच्चू भाऊंचे हळवे रूप ! शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये रमले; बरोबर उत्तर देणाऱ्यास बक्षीसही दिले

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यमंत्र्यांनी साधला नंद्राबादशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद

औरंगाबाद ः जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नंद्राबाद (ता.खुलताबाद) येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेला शुक्रवारी दुपारी अडीच वाजता अचानक भेट दिली. यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे बरोबर उत्तर दिलेल्या विद्यार्थ्यास त्यांनी खुश होत रोख बक्षीसही दिले. यावेळी पाचवी ते सातवी ३३ पैकी २२ विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. मात्र, विद्यार्थी कमी का बोलतात, याचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना त्यांनी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांना दिल्या.

ग्रामीण भागात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु झाले. विद्यार्थी उपस्थितीची आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती कडू यांना जाणून घ्यायची होती. यावेळी त्यांनी सरपंच इलियास शेख, शालेय समितीच्या अध्यक्ष आरती भोले यांच्यासह शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला. १ आॅगस्टपासून गावात समुह पद्धतीने शिक्षण सुरु असल्याचे गावकरी व शिक्षकांनी त्यांना सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी जयस्वाल, गटशिक्षणाधिकारी सचिन सोळंकी, विस्तार अधिकारी विलास केवट आदीची उपस्थिती होती.

उत्तरावर खुश झाल्याने दिले विद्यार्थ्याला बक्षीस
सातवीचा विद्यार्थी सुमित बोडखे या विद्यार्थ्याला कडू यांनी गुरुवारी काय शिकले हे विचारले असता त्याने असे जगावे ही कविता शिकल्याचे सांगितले. त्यावर कडू यांनी त्यातून काय शिकले असे विचारल्यावर आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली. कितीही संकटे आली तर न घाबरता त्या परिस्थितीला तोंड दिले पाहीजे असे शिकल्याचे सांगितले. त्यावर खुश होऊन कडू यांनी विद्यार्थ्याला रोख बक्षीस दिले.

Web Title: Gentle look of Minister Bachchu Kadu ! Visited the school and played among the students; He also gave a reward to the one who answered correctly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.