पुन्हा सापडल्या चार तलवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 01:04 AM2018-06-04T01:04:57+5:302018-06-04T01:05:21+5:30

बिडकीन पोलिसांनी रविवारी चितेगाव येथे तलवारी बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळील चार तलवारी जप्त केल्या आहेत

Four swords again found | पुन्हा सापडल्या चार तलवारी

पुन्हा सापडल्या चार तलवारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चितेगाव : बिडकीन पोलिसांनी रविवारी चितेगाव येथे तलवारी बाळगणाऱ्या तीन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळील चार तलवारी जप्त केल्या आहेत. वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याचा मोठेपणा दाखविण्याचा प्रकार त्या तरुणांना चांगलाच महागात पडला. पोलिसांनी वाढदिवसाला तलवारीने केक कापणा-या तरुणांची धरपकड सुरू केली. त्या तरुणांच्या घरांची झाडाझडती घेतली असता
त्यांच्याकडे धारदार चार तलवारी आढळल्या. विजय बाळासाहेब सुखदान (१९, रा. चितेगाव, ता. पैठण), सचिन छगुराव खरात (१९, रा.चितेगाव, ता. पैठण), संतोष टाक (४५, रा. आलानातांडा ता. जि. औरंगाबाद) अशी त्या तरुणांची नावे आहेत. चार दिवसांपूर्वी शस्त्र बनवणारे साहित्य व कारखान्यातून पाच तलवारी जप्त केल्या होत्या. त्यावरून बिडकीन पोलीस पथकाने सोशल मीडियाचा आधार घेत धरपकड सुरू केली आहे.
शहरात कुरिअर सेवेतून आलेल्या तलवारीचे पार्सल डीएमआयसी परिसरात उतरले आहेत. कुरिअरच्या माध्यमातून तलवारी आल्या असाव्यात, अशी पोलीसांना शंका आहे. तलवारी बनविणारा कारखानाच पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. रविवारी चार तलवारी, एकूण ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

Web Title: Four swords again found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.