बळजबरी लावले लग्न, विवाहितेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:52 PM2020-10-02T12:52:52+5:302020-10-02T12:54:34+5:30

पती आणि त्याच्या मामा- मामीने ओळखीच्या लोकांकडुन विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक तक्रार पोलिसांकडे गुरूवारी रात्री उशिरा करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत बेगमपुरा पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Forced marriage, oppression of the married | बळजबरी लावले लग्न, विवाहितेवर अत्याचार

बळजबरी लावले लग्न, विवाहितेवर अत्याचार

googlenewsNext

औरंगाबाद: पती आणि त्याच्या मामा- मामीने ओळखीच्या लोकांकडुन विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक तक्रार पोलिसांकडे गुरूवारी रात्री उशिरा करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत बेगमपुरा पोलिसांनी गुरुवारी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

नॅशनल कॉलनी आणि मकसूद कॉलनी परिसरात ही घटना घडली. पती मोहम्मद उमर मोहम्मद जावेद, मोहम्मद इब्राहिम, हुस्ना बेगम इब्राहिम मोहम्मद अशी आरोपींची नावे आहेत. याविषयी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार तरुणीवर आरोपी उमरने बायपास परिसरातील घरी बलात्कार केला होता. याप्रकरणी पिडितेने त्याच्यावर सातारा ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तडजोड करावी, याकरिता मोहम्मद नूर आणि मोहम्मद इस्माईल यांनी तिला त्रास दिला म्हणून त्यांच्यावरही तिने अदखलपात्र गुन्हा नोंदविला.

यानंतरही त्यांनी तडजोडीसाठी तिच्यावर दबाव टाकून उमरसोबत दि. १५ जून रोजी तिचे बळजबरीने धर्मांतर करून लग्न लावून दिले.  यानंतर उमर  आणि ती नॅशनल कॉलनीत राहू लागले. लग्नाच्या चार ते पाच दिवसांनी आरोपी उमर घरी नसताना इब्राहिम आणि हुस्ना बेगम हे तिच्या घरी एका व्यक्तीला घेऊन आले. त्या व्यक्तीला तिच्या घरी रात्रभर मुक्कामाला ठेवण्यास सांगून ते घराला बाहेरून कडी लावून निघून गेले.

तेव्हा त्या अनोळखी व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केला. अशाच प्रकारे त्यांनी तिला मकसूद कॉलनीतही अनोळखी व्यक्तीसोबत लैंगिक सबंध  ठेवण्यास भाग पाडले. दरम्यान काही दिवसांपूर्वी उमर घर सोडून निघून गेल्यामुळे ती तरूणी तिच्या आई वडिलांच्या घरी गेली. काल ती घरी परतली असता तिचे दागिने आणि लॅपटॉप दिसला नाही. याविषयी तिने उमरकडे विचारणा केली असता, त्याने एक लाखाची मागणी करून तिला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.

Web Title: Forced marriage, oppression of the married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.