जुळ्या मुलींना हॉस्पिटलमध्ये ठेऊन पसार झालेल्या माता-पित्याविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 04:56 PM2019-11-05T16:56:00+5:302019-11-05T17:02:03+5:30

दांम्पत्याचा पत्ता पुर्ण नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत

FIR against parents who left Twin girls in hospital | जुळ्या मुलींना हॉस्पिटलमध्ये ठेऊन पसार झालेल्या माता-पित्याविरोधात गुन्हा दाखल

जुळ्या मुलींना हॉस्पिटलमध्ये ठेऊन पसार झालेल्या माता-पित्याविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : नवजात जुळ्या मुलींना दवाखान्यात टाकून पसार झालेल्या माता-पित्याविरूध्द अखेर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दांम्पत्याचा पत्ता पुर्ण नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्यात अडचणी येत असल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी दिली आहे.

धक्कादायक ! जुळ्या मुलींना हॉस्पिटलमध्ये ठेऊन आईसह नातेवाईक पसार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित भिकुलाल भंडारी (रा.रामकृष्ण शाळेजवळ, शिवाजीनगर, सिल्लोड) यांनी आपल्या पत्नीला जळगाव रोडवरील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. भंडारी दाम्पत्यास २१ आॅक्टोबर रोजी दोन जुळ्या मुली झाल्या. मुलींचे वजन कमी असल्याने त्याच दिवशी दोन्ही मुलींना हडकोतील निमाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे  दोन दिवस उपचार केल्यानंतर रुग्णालयांनी चिमुकलींच्या आई-वडिलांना पैसे भरण्याचे सांगितले. दोन दिवस ते भरतो असे म्हणाले आणि अचानक  रुग्णालयातून पसार झाले. यानंतर तीन दिवस रुग्णालयाने मुलींच्या वडिलांशी संपर्क साधून तातडीने बिल भरण्याचे सांगितले. मात्र त्यांनी रुग्णालयास प्रतिसाद दिला नाही. ही बाब समजल्यानंतर रुग्णालयाने सिडको पोलीस ठाण्याला याविषयी कळविले. सिडको पोलिसांनी याबाबत बाल कल्याण समितीकडे आपला अहवाल पाठविला.  समितीने दोन्ही मुलींना संगोपनासाठी भारतीय समाज सेवा केंद्र या अनाथालयाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. 

दरम्यान, पसार झालेल्या मोहित भंडारी व त्याच्या पत्नी विरोधात पोलीस ठाण्याचे जमादार रमेश जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शिरसाट करत आहेत.

Web Title: FIR against parents who left Twin girls in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.