उद्योगनगरीत बडतर्फ कामगाराचे कुटुंबासह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:06 AM2021-03-05T04:06:17+5:302021-03-05T04:06:17+5:30

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील इंडिको रेमेडिज लिमिटेड या कंपनीतील बडतर्फ कामगाराने पुन्हा कामावर रुजू करावे, या मागणीसाठी गुरुवारपासून ...

Fasting with the family of the workers in the industrial city | उद्योगनगरीत बडतर्फ कामगाराचे कुटुंबासह उपोषण

उद्योगनगरीत बडतर्फ कामगाराचे कुटुंबासह उपोषण

googlenewsNext

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील इंडिको रेमेडिज लिमिटेड या कंपनीतील बडतर्फ कामगाराने पुन्हा कामावर रुजू करावे, या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.४) कंपनीसमोर कुटुंबासह उपोषण सुरू केले आहे.

किरण दिगंबर गिरी (वय ३५, रा.पाटोदा) हे इंडिको रेमेडिज कंपनीत ७ वर्षांपासून हाऊसकीपिंग सुपरवायझर म्हणून काम करीत होते. चार-पाच महिन्यांपासून किरण गिरी व कंपनी व्यवस्थापनात वाद सुरू होता. त्यामुळे गिरी यास काही दिवसांपूर्वी कंपनीने बडतर्फ केले. पूर्वसूचना न देता बडतर्फ केल्यामुळे गिरी व त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. कंपनी व्यवस्थापन कामावर रुजू करुन घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने गिरी यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. मात्र, वेळीच वैद्यकीय उपचार मिळाल्याने त्याचे प्राण वाचले होते. १ मार्च रोजी कंपनीचे अधिकारी निलेश नालट यांनी किरण गिरी याने आपल्याला रस्त्यात अडवून शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. कामावर रुजू करून घेण्याऐवजी विनाकारण खोटे गुन्हा दाखल करण्यात आल्याने गिरी यांनी आई, पत्नी व दोन मुलांना सोबत घेऊन गुरुवारपासून कंपनीसमोर उपोषण सुरू केले आहे. कंपनीचे निलेश नालट यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने व्यवस्थापनाची बाजू समजू शकली नाही.

फोटो ओळ- कंपनीसमोर किरण गिरी या कामगाराने कुटुंबासह उपोषण सुरू केले आहे.

---------------------------------

Web Title: Fasting with the family of the workers in the industrial city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.