उद्योजक शैलेन्द्र राजपूत खून प्रकरण; पतीच्या खुनाचा पूजाला झाला पश्चात्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:21 PM2019-09-19T18:21:21+5:302019-09-19T18:22:20+5:30

पूजा राजपूतला २३ पर्यंत पोलीस कोठडी

Entrepreneur Shailendra Rajput murder case; Worship of husband murdered | उद्योजक शैलेन्द्र राजपूत खून प्रकरण; पतीच्या खुनाचा पूजाला झाला पश्चात्ताप

उद्योजक शैलेन्द्र राजपूत खून प्रकरण; पतीच्या खुनाचा पूजाला झाला पश्चात्ताप

googlenewsNext
ठळक मुद्देमुलींना भेटण्याची इच्छा

औरंगाबाद : कौटुंबिक वादातून रागाच्या भरात उद्योजक पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या पूजा राजपूतला आता पश्चात्ताप होत आहे. महिला पोलिसांशी बोलताना तिने याविषयी खंत व्यक्त करीत, मुलींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. न्यायालयाने पूजाला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

उल्कानगरी भागातील मे-फेअर या उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या उद्योजक शैलेंद्र शिवसिंग राजपूत आणि त्यांची पत्नी पूजा राजपूत यांचे आर्किटेक्ट मैत्रिणीवरून सोमवारी मध्यरात्री भांडण झाले होते. हा वाद विकोपाला जाऊन शैलेंद्रने पूजाला मारहाण केल्याने पूजाने रागाच्या भरात शैलेंद्रवर चाकूने वार केला. यात शैलेंद्रचा मृत्यू झाला. घटनेनंतर  जवाहरनगर पोलिसांनी पूजाला अटक केली. घटनेच्या २४ तासांपर्यंत पूजा  ही केवळ शांत    बसून होती. पतीसोबत भांडण कशावरून झाले आणि त्याला कशाने मारले, त्याला रुग्णालयात का नेले नाही, अशी विचारणा शैलेंद्रच्या भावांनी वारंवार तिच्याकडे केल्यानंतर तिने काहीच सांगितले नाही. दोन महिला पोलीस तिच्यासोबत आहेत.

घटनेला ३६ तास उलटल्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी पूजाला लॉकअपमधून जवाहरनगर पोलीस ठाण्यात आणले. तेव्हा महिला पोलिसांशी बोलताना पूजाने पतीला मारल्याबद्दल खंत व्यक्त केली. त्यांचे परस्परांवर प्रचंड प्रेम होते. मात्र अलीकडच्या काळात त्यांच्यात सतत खटके उडत. परंतु शैलेंद्रवरील प्रेम काही कमी झाले नव्हते. राग एवढा अनावर झाला होता, की स्वयंपाकघरातून चाकू आणून शैलेंद्रवर वार करण्याचे धाडस केले. मात्र घाव थेट अवघड ठिकाणी जांघेत लागल्याने शैलेंद्रचा मृत्यू झाला. या कृत्याचा आता पश्चात्ताप होत असल्याचे तिच्या बोलण्यातून जाणवत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पूजाला २३ पर्यंत पोलीस कोठडी
जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शशिकांत तायडे आणि कर्मचाऱ्यांनी पूजाला बुधवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  व्ही. डी. सुंगारे यांच्या न्यायालयात हजर केले. ४ सहायक सरकारी वकील पी. पी. जरिना यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपी पूजा हिचे रक्ताने माखलेले कपडे जप्त करणे, पतीच्या खुनामागे नेमका काय वाद आहे, याबाबत पूजाची चौकशी करायची आहे, तसेच या खुनात आणखी कोणी तिचे साथीदार आहेत का? यासंदर्भात तपास करायचा असल्याने पूजाला ७ दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. सरकार पक्षाचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने पूजाला २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

Web Title: Entrepreneur Shailendra Rajput murder case; Worship of husband murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.