विदेशातून रॉ-मटेरिअल मागविणे महागात पडले; बनावट ई-मेल आयडीच्या आधारे उद्योजकाला अठरा लाखाला फसवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 12:42 PM2021-04-01T12:42:20+5:302021-04-01T12:43:14+5:30

२३ ऑक्टोबर २०२० रोजी देवळाणकर यांनी कंपनीच्या बँक खात्यावर २४५६७.७२ डॉलर (भारतीय चलनात १८ लाख २८ हजार ३१७ रुपये) ट्रान्स्फर केले.

Entrepreneur cheated of Rs 18 lakh on the basis of fake e-mail IDs | विदेशातून रॉ-मटेरिअल मागविणे महागात पडले; बनावट ई-मेल आयडीच्या आधारे उद्योजकाला अठरा लाखाला फसवले

विदेशातून रॉ-मटेरिअल मागविणे महागात पडले; बनावट ई-मेल आयडीच्या आधारे उद्योजकाला अठरा लाखाला फसवले

googlenewsNext
ठळक मुद्देविदेशातून रॉ-मटेरिअल मागविणे महागात पडले

वाळूज महानगर : विदेशातून रॉ-मटेरियल पाठविण्याची थाप मारून बनावट मेल आयडीच्या आधारे वाळूज उद्योगनगरील एका उद्योजकाला सायबर भामट्याने सव्वा अठरा लाखांना गंडा घातला. या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

विनायक शंकरराव देवळाणकर (एन ४, सिडको) यांची वाळूज एमआयडीसीत मनू इलेक्ट्रिकल नावाची कंपनी आहे. या कंपनीत लागणारा कच्चा माल देवळाणकर हे दक्षिण कोरियातील आय.के. टेक कंपनीकडून मागवत असतात. या विदेशी कंपनीचे औरंगाबादला वास्तव्यास असणारे प्रतिनिधी के. एल. ज्युंग यांच्या मदतीने ते माल मागवीत असतात. कच्चा माल घेण्यासाठी देवळाणकर यांनी ज्युंग यांच्या माध्यमातून कोरियाच्या कंपनीला ऑर्डर दिली होती. या ऑर्डरनंतर कंपनीकडून देवळाणकर यांना मेल पाठवून मालाचे पैसे कंपनीच्या खात्यावर टाकण्याची सूचना देण्यात आली. २३ ऑक्टोबर २०२० रोजी देवळाणकर यांनी कंपनीच्या बँक खात्यावर २४५६७.७२ डॉलर (भारतीय चलनात १८ लाख २८ हजार ३१७ रुपये) ट्रान्स्फर केले. दोन दिवसांनी देवळाणकर यांनी कंपनीचे प्रतिनिधी ज्युंग यांना फोन करून पैसे पाठविले असून माल केव्हा येणार अशी विचारणा केली. ज्युंग यांनी देवळाणकर यांना तुमचे पेमेंट कंपनीला पोहोचले किंवा नाही याची खात्री करून तुमचा माल पाठवितो असे सांगितले होते. २६ ऑक्टोबर रोजी ज्युंग यांनी देवळाणकर यांना पेमेंट आमच्या कंपनीला मिळाले नसल्याचे सांगितले.

बनावट मेल आयडीच्या आधारे घातला गंडा
देवळाणकर यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता बँकेने पैसे पाठविल्याचे पुरावे दिले. देवळाणकर यांनी ज्युंग यांची भेट घेऊन त्यांना बँकेने दिलेली कागदपत्रे दाखविली असता त्यांनी तपासणी करून ते खाते आमच्या कंपनीचे नसल्याचे सांगितले. भामट्याने ज्युंग यांच्या मेल आयडीसारखाच दुसरा बनावट मेल आयडी तयार करून देवळाणकर यांनी पाठविलेले पैसे आपल्या खात्यात वळते केल्याचे समोर आले. देवळाणकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून या फसवणुकीची तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी चौकशी करून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम पोलीस निरीक्षक पोतदार हे करीत आहेत.

Web Title: Entrepreneur cheated of Rs 18 lakh on the basis of fake e-mail IDs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.