अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील योग्य मार्गदर्शन मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:06 AM2021-01-20T04:06:32+5:302021-01-20T04:06:32+5:30

औरंगाबाद : सध्याच्या काळात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील अनुभव व योग्य मार्गदर्शन मिळाले तर अभियांत्रिकी क्षेत्र अधिक गतीने पुढे ...

Engineering students should get proper guidance in technology | अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील योग्य मार्गदर्शन मिळावे

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील योग्य मार्गदर्शन मिळावे

googlenewsNext

औरंगाबाद : सध्याच्या काळात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानातील अनुभव व योग्य मार्गदर्शन मिळाले तर अभियांत्रिकी क्षेत्र अधिक गतीने पुढे जाईल, विकासात्मक कामे दर्जेदार होण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन निवृत्त अधीक्षक अभियंता डॉ. आर. व्ही. म्हैसेकर यांनी केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरनाल यांच्या मार्गदर्शनाखाली वेबिनार सीरिजचे उद्‌घाटन निवृत्त अधीक्षक अभियंता डॉ. म्हैसेकर यांच्या हस्ते झाले. ते पुढे म्हणाले, तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान झालेच पाहिजे. वेबिनार सीरिजचा हा सुत्य उपक्रम असून, ही विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणीच ठरेल. विद्यार्थ्यांनीही याचा फायदा घेतला पाहिजे.

असे विविध कार्यक्रम आयोजनासाठी मार्गदर्शन व सर्वतोपरी मदत करत असतात.

वर्षभर चालणाऱ्या वेबिनार सीरिजमध्ये प्रामुख्याने सर्व शाखांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण घडामोडी, नवनवे संशोधन, इन्फ्रास्ट्रक्चर्स, उद्योग जगत व शैक्षणिक बांधीलकी, उद्योग क्षेत्रातील विकास, बांधकाम, सिंचन, पर्यटन, पुरातत्व, कृषी, विद्युत, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स, यंत्र अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी, आपत्ती व्यवस्थापन तसेच शैक्षणिक क्षेत्राशी निगडित घडामोडी व संशोधनाबाबत विविध क्षेत्रांतील राष्ट्रीय- अंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी आयआयटी, एनआयटी, सीआरआरआय, राज्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञ, निवृत्त अभियंते विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे मार्गदर्शन करणार आहेत.

या उपक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. आर. एम. दमगीर यांनी सांगितले की, वेबिनार सीरिज आयोजित करण्याचा हा पहिलाचा प्रयत्न असून, हा उपक्रम ऑनलाईन पद्धतीने राबविला जाणार आहे. याचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना निश्चितच होईल.

या उपक्रमासाठी कृष्णा अमिलकंठवार, स्नेहल गाडेकर, सोनल कुलकर्णी, सुरेश भांगे, आम्रपाली कोटांगळे, ऋचा मुंढे, रश्मी पुरुषोत्तम, निकिता भांगे, प्राक्तन पांडव, विशाल कदम, रितेश शेळके, श्रद्धा वनगुजरे, शुभम होरे, मनोज शिंगोटे, पूजा भोगे, प्रज्ञा महिरे व अन्य विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

Web Title: Engineering students should get proper guidance in technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.