पैठण येथे एकनाथी भागवत जयंती साजरी

By | Published: December 2, 2020 04:12 AM2020-12-02T04:12:47+5:302020-12-02T04:12:47+5:30

दक्षिण काशी पैठण येथे संत एकनाथ महाराजांनी प्राकृतमधून एकनाथी भागवत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला. हा ग्रंथ काशी येथे सन ...

Eknathi Bhagwat Jayanti celebration at Paithan | पैठण येथे एकनाथी भागवत जयंती साजरी

पैठण येथे एकनाथी भागवत जयंती साजरी

googlenewsNext

दक्षिण काशी पैठण येथे संत एकनाथ महाराजांनी प्राकृतमधून एकनाथी भागवत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ केला. हा ग्रंथ काशी येथे सन १४९५ ते १५७३ मध्ये लिहून पूर्ण केला. नाथांनी लिहिलेला ग्रंथ काशीकरांना अत्यंत आवडला. त्यामुळे त्यांनी एकनाथी भागवत या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढून एकनाथ महाराजांचा जयजयकार केला. या घटनेला कार्तिकी पौर्णिमेला म्हणजे ३० नोव्हेंबर २०२० रोजी ४४७ वर्षे पूर्ण झाले आहेत. यानिमित्त एकनाथी भागवत या ग्रंथाची पूजा गणेश जोशी, कमलताई कुलथे यांच्या हस्ते करण्यात आली. एकनाथी भागवत हा ग्रंथ महाराष्ट्रातील नाथ भक्ताकडून मोठ्या आवडीने वाचल्या जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन एकनाथी भागवत जयंती उत्सव अत्यंत साध्यापणाने साजरा करण्यात आला. उत्सव यशस्वी करण्यासाठी भगवान मिटकर, राजू लोहिया, महेश खोचे, दिनेश पारीख, विष्णू ढवळे आदींनी परिश्रम घेतले. रघुनाथ महाराज पालखीवाले व योगेश महाराज पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली बाहेरील नाथ समाधी मंदिरात एकनाथी भागवत पारायण सप्ताह सालाबादाप्रमाणे साजरा करण्यात आला.

Web Title: Eknathi Bhagwat Jayanti celebration at Paithan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.