ऐंशी वर्षांच्या आजीने सकारात्मक विचाराने कोरोनाला हरवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:11+5:302021-05-08T04:06:11+5:30

सिंधूबाईंच्या घरात इतर कोणालाही कोरोना नव्हता; पण आजीला कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्यांची त्वरित चाचणी केली. यात त्यांना कोरोना असल्याचे ...

The eighty-year-old grandmother defeated Corona with positive thinking | ऐंशी वर्षांच्या आजीने सकारात्मक विचाराने कोरोनाला हरवले

ऐंशी वर्षांच्या आजीने सकारात्मक विचाराने कोरोनाला हरवले

googlenewsNext

सिंधूबाईंच्या घरात इतर कोणालाही कोरोना नव्हता; पण आजीला कोरोनाची लक्षणे जाणवल्यानंतर त्यांची त्वरित चाचणी केली. यात त्यांना कोरोना असल्याचे समजताच २३ एप्रिलला त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ऑक्सिजन लेव्हल ८५ व त्यांना रक्तदाब असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा एचआर सीटीस्कॅन करण्यात आला. तो स्कोअर १६ आल्यामुळे व वय लक्षात घेऊन त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याने घरातील सदस्य घाबरले हाेते. मात्र, आजीने स्वतः धीर सोडला नाही. मला केवळ साधा खोकला व पडसे असून, मी लवकर बरी होणार आहे, असा सकारात्मक विचार करत उपचारास त्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी कोरोनाला पळवून लावले. या आजाराला घाबरायचे नसते, तर खंबीर होऊन उपचाराला प्रतिसाद दिल्यास यावर विजय मिळवता येतो, असा संदेश त्यांनी इतर रुग्णांना दिला. पंधरा दिवसांच्या उपचारांनंतर ७ मेला आजी ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या.

Web Title: The eighty-year-old grandmother defeated Corona with positive thinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.