मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आजी-माजी खासदारांमध्ये रंगले खुर्ची नाट्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:03 PM2020-01-10T12:03:20+5:302020-01-10T12:08:02+5:30

मुख्यमंत्र्यांनी सदरील प्रकरणाची घेतली नोंद 

dispute between Khaire and Jaleel over seating arrangement at the CM's meeting | मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आजी-माजी खासदारांमध्ये रंगले खुर्ची नाट्य 

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आजी-माजी खासदारांमध्ये रंगले खुर्ची नाट्य 

googlenewsNext
ठळक मुद्देअब तो आदत सी हो गयी है; खासदार जलील यांची प्रतिक्रिया या नाट्यामुळे खैरे माध्यम प्रतिनिधींवर संतापले

औरंगाबाद : खा. इम्तियाज जलील आणि माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्यात गुरुवारी विभागीय आयुक्तालयात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील आढावा बैठकीत खुर्ची नाट्य रंगले. या नाट्यामुळे खैरे माध्यम प्रतिनिधींवर संतापले, तर खा. जलील म्हणाले, त्यांना खुर्चीची लागलेली सवय सुटत नाही, त्याला मी काय करू शकतो. मुख्यमंत्र्यांनी खुर्चीपेक्षा आमच्या मागण्यांकडे जास्त लक्ष दिल्याचे खा. जलील यांनी यावेळी नमूद केले. हा प्रकार मुख्यमंत्र्यांसमक्ष घडल्याने त्यांनी याची नोंद घेतली आहे, असेही ते म्हणाले. 

आढावा बैठकीत औरंगाबाद जिल्ह्याच्या बैठकीदरम्यान शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या खुर्चीचा ताबा घेतल्याची माहिती बाहेर आली. खा. जलील यांचे  नाव असलेल्या खुर्चीवर खैरे जाणूनबुजून बसले. त्यामुळे जलील यांना इतरत्र बसावे लागले होते. यावर खा. जलील म्हणाले की, बैठकीत सर्व लोकप्रतिनिधींची नेमप्लेट तयार करण्यात आली होती. ती खुर्चीसमोर होती. त्यानुसार खैरेंनी त्यांच्या नेमप्लेटच्या खुर्चीवर बसणे गरजेचे होते. खैरे माझ्या खुर्चीवर बसल्यामुळे मी दुसरीकडे बसलो होतो. मी कुठे बसलो यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नांना न्याय दिला, हे महत्त्वाचे आहे. माजी खा. खैरे यांना खुर्चीची सवय असून, ती अद्याप गेली नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नांबाबत संबंधित यंत्रणेला सूचना केल्या. 

Web Title: dispute between Khaire and Jaleel over seating arrangement at the CM's meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.