'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2021 01:26 PM2021-10-23T13:26:10+5:302021-10-23T13:27:30+5:30

CM Uddhav Thackeray : कोर्ट रिकामी रहावीत, अशा समाज सुधारणेचे मोठे आव्हान स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सर्वांनी स्वीकारावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.  

'desires and rights are different'; Legal experts should define 'freedom' - Uddhav Thackeray | 'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे

'मर्जी वेगळी आणि अधिकार वेगळा'; विधी तज्ञांनी 'स्वातंत्र्या'ची नेमकी व्याख्या करावी : उद्धव ठाकरे

googlenewsNext

औरंगाबाद : गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट करणारी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे. समाजातील गुन्हेगारी नष्ट होऊन कोर्ट रिकामे व्हावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज व्यक्त केली. तसेच एखाद्याची मर्जी वेगळी आणि त्याचा अधिकारी वेगळा आहे, स्वातंत्र्याची नेमकी व्याख्या विधी तज्ञांनी करावी असे मत यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मांडले. ते औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 

ठाकरे पुढे म्हणाले, महिलांवरी अत्याचार देशात मोठ्या प्रमाणावर, असहाय्य, बेघर महिलां अत्याचाराला बळी पडत आहेत. गुन्हा घडल्यास लवकर न्याय मिळाला, मात्र, आपल्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती नष्ट  झाली पाहिजे. गुन्हाच झाला नाही पाहिजे अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात यावर आपण प्राधान्याने काम करावे.

राज्य सुद्धा सार्वभौम, केंद्राप्रमाणेच अधिकार
अधिकाराच्या बाबतीत राज्याच्यावर केंद्र सरकार आहे का ? राज्याचा अधिकार कुठे आहेत ? यावर माहिती घेतली असता, एक मोजके अधिकार सोडले ते केंद्रा ऐवढेच राज्य सार्वभौम आहेत, केंद्रा एवढीच राज्यांना ताकद आहे  असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केल्याचे पुढे आले. मात्र राज्यांना ते अधिकारी आहेत का यावर विचार व्हावा. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्व जेष्ठ विधी तज्ञांनी स्वातंत्र्य म्हणजे काय याची नेमकी व्याख्या करावी. एखाद्याची मर्जी वेगळी आणि त्याचे अधिकार वेगळे हे त्यांनी स्पष्ट करावे, असे मत व्यक्त केले. तसेच घटनेच्या चौकटीचे सर्वांनी पालन केले तरी समाज गुन्हे मुक्त होईल,असे कार्य स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले . 

Web Title: 'desires and rights are different'; Legal experts should define 'freedom' - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.