शिक्षकांची पुरवणी बिले निकाली काढण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:06 AM2021-05-09T04:06:01+5:302021-05-09T04:06:01+5:30

गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर १५ एप्रिल रोजी पुरवणी देयकांचा निधी जमा झाला आहे. पुरवणी देयकाची बिले शासनाने ठरवून दिलेल्या ...

Demand for settlement of teachers' supplementary bills | शिक्षकांची पुरवणी बिले निकाली काढण्याची मागणी

शिक्षकांची पुरवणी बिले निकाली काढण्याची मागणी

googlenewsNext

गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर १५ एप्रिल रोजी पुरवणी देयकांचा निधी जमा झाला आहे. पुरवणी देयकाची बिले शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार असल्याने जिल्हा परिषदेकडून मंजुरी देखील मिळाली आहे. शिक्षकांची वैद्यकीय बिले, पगार निश्चिती आदी बिलांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१९ पासून ही बिले प्रलंबित असल्याने बिले मिळण्यास उशीर झाला आहे. निधी प्राप्त असतानाही शिक्षकांना रक्कम का दिली जात नाही, असा प्रश्न करीत त्वरित ही बिलांची रक्कम देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर विभागीय अध्यक्ष शिवाजी डुकरे, रऊफ पठाण, लक्ष्मीकांत धाडबळे, दादासाहेब पटारे, के. डी. मगर, सुनील धाडबळे, राजू डिक्के, दिलीप ढमाले, दादासाहेब तुतारे, शिला भालेराव, अश्विनी सोनवणे, निवेदिता गाडेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Demand for settlement of teachers' supplementary bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.