Death of old age in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू
दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद : रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सायंकाळी बीड बायपासवर सूर्या लॉन्ससमोर घडला.


दत्तात्रय नारायण मुरलीधर (८२, रा.भारत अपार्टमेंट, पुंडलिकनगर) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, दत्तात्रय हे बायपास परिसरात राहणाºया नातेवाईकांकडे गेले होते. गुरुवारी सायंकाळी ते बायपासवरील एका लॉन्ससमोर रस्ता ओलांडत असताना दुचाकीस्वाराने त्यांना उडविले.

या घटनेत दत्तात्रय यांच्यासह दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती देवळाई चौकात वाहतूक नियमन करीत असलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षक एन. जी. बनसोड यांना समजली.

बनसोड आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहिकेतून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना दत्तात्रय यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पुंडलिकनगर ठाण्यात करण्यात आली. पोहेकॉ. चव्हाण तपास करीत आहेत.


Web Title: Death of old age in a two-wheeler accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.