coronavirus : औरंगाबादमध्ये जयभीमनगर, जाधववाडीतील दोन वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 09:41 AM2020-05-26T09:41:29+5:302020-05-26T09:50:24+5:30

या २ मृत्यूमुळे आतापर्यंतची कोरोनाबळींची संख्या ५८ झाली आहे.

coronavirus: Two old men from Jaybhimnagar, Jadhavwadi in Aurangabad died due to coronavirus | coronavirus : औरंगाबादमध्ये जयभीमनगर, जाधववाडीतील दोन वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू

coronavirus : औरंगाबादमध्ये जयभीमनगर, जाधववाडीतील दोन वृद्धांचा कोरोनामुळे मृत्यू

googlenewsNext

ir="ltr">औरंगाबाद : शहरातील जयभीमनगर आणि जाधववाडी येथील कोरोनाबाधित वृद्धांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मााहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या २ मृत्यूमुळे शहरातील आतापर्यंतची कोरोनाबळींची संख्या ५८ झाली आहे.

जयभीमनगर येथील ७२ वर्षीय वृद्धाचा जिल्हा रुग्णालयात २४ मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच दिवशी रुग्णाला घाटीत संदर्भीत करण्यात आले. भरतीवेळीच रुग्णाची प्रकृती गंभीर होती. मधुमेह, बीपी आदी व्याधीसह तीव्र श्वसन विकारामुळे त्यांना कृत्रिम श्वास देण्यात आला होता. त्यांचा कोरोनामुळे २६ मे मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला.

जाधववाडी येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाला १८ मे रोजी घाटीच्या कोव्हिड वॉर्ड सहा मध्ये भरती करण्यात आले. छातीचा व मेंदूचा क्षयरोग आणि श्वसन विकाराने त्यांना ग्रासलेले होते. १९ मे रोजी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. प्रकृती गंभीर बनली. अखेर सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

जिल्ह्यात १३२७ कोरोनाबाधित

शहरातील २२ रुग्णांचे अहवाल मंगळवारी सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकुण  संख्या १३२७ झाली. मंगळवारी जुना मोंढा- १,  बायजीपुरा- १, रोहिदासपुरा-१, कांचनवाडी-१, भारतमातानगर (हडको)-१, नवीनवस्ती (जुनाबाजार )- ४,  जुना हनुमाननगर-१, हनुमान चौक-१, न्यायनगर-१, कैलाशनगर-१, रामनगर-१, एन ८ (सिडको )-४, रोशन गेट-१, एन ११ (सुभाषचंद्र नगर)- १, पुंडलीक नगर-१, भवानीनगर -१, या भागात कोरानाबाधित आढळले आहेत. यामध्ये ११ महिला आणि ११ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: Two old men from Jaybhimnagar, Jadhavwadi in Aurangabad died due to coronavirus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.