coronavirus औरंगाबादेत नव्या बाधितांची रेकॉर्ड ब्रेक वाढ : १६३ रुग्णांची भर, एक मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 10:15 AM2020-06-23T10:15:53+5:302020-06-23T10:16:56+5:30

एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे.

coronavirus Record-breaking increase in new cases in Aurangabad: Addition of 163 patients, one death | coronavirus औरंगाबादेत नव्या बाधितांची रेकॉर्ड ब्रेक वाढ : १६३ रुग्णांची भर, एक मृत्यू

coronavirus औरंगाबादेत नव्या बाधितांची रेकॉर्ड ब्रेक वाढ : १६३ रुग्णांची भर, एक मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी सकाळच्या सत्रात आतापर्यंतची रेकोर्ड ब्रेक रुग्णांची वाढ झाली. तब्बल १६३ रुग्णांची भर पडून एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३८१९ झाली आहे. तर एक मृत्यू झाल्याने मृतांचा आतापर्यंतचा आकडा २०३ झाल्याचे प्रशासनाने कळवले आहे.


वाढलेल्या रुग्णांपैकी ११२ रुग्ण मनपा क्षेत्रांतर्गत असून ५१ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. यापैकी २००५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर २०३ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १६११ रुग्णांवर उपचार सुरू आहे. रुग्ण संख्येचा रोज नवा उच्चाक गाठला जात असून मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत असल्याने जिल्ह्यातील कोरोना संक्रमण चिंतादायी बनले आहे.


शहरी भागातील आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात आढळलेल्या शहरात शिवाजी नगर ४, सिडको एन चार, जय भवानी नगर १, बौद्ध नगर, जवाहर कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ४, बायजीपुरा १, हमालवाडी, रेल्वे स्टेशन परिसर १, सिडको १, तानाजी चौक, शिवशंकर कॉलनी १, उत्तम नगर १, समर्थ नगर १, म्हाडा कॉलनी १, अरिफ कॉलनी १, कोटला कॉलनी १, उस्मानपुरा १, एन नऊ सिडको ३, अंबिका नगर १, पडेगाव १, भानुदास नगर ७, न्यू नंदनवन कॉलनी १, विष्णू नगर १, उल्का नगरी १, पद्मपुरा ५, क्रांती नगर १, नागेश्वरवाडी २, नक्षत्रवाडी १, एन पाच सिडको २, एन सहा, मथुरा नगर ३, गजानन नगर ६, औरंगपुरा १, जय भवानी नगर ८, एन सहा, संभाजी कॉलनी १, नानक नगर १, शिवनेरी कॉलनी, गारखेडा १, म्हाडा कॉलनी, धूत हॉस्पीटल जवळ १, एन सहा सिडको २, सेवा नगर हाऊसिंग सोसायटी १, राज हाइट, सेव्हन हिल जवळ १, जे सेक्टर, मुकुंदवाडी १, भगतसिंग नगर ३, विठ्ठल नगर, मुकुंदवाडी १, कॅनॉट प्लेस १, न्यू विशाल नगर १, श्री साईयोग हाऊसिंग सोसायटी १, राजेसंभाजी कॉलनी, जाधववाडी १, मुकुंदवाडी २, मयूर नगर १, आयोध्या नगर २, बौद्धवाडा चिकलठाणा १,  चिकलठाणा हनुमान चौक २, सुरेवाडी १, विजय नगर २, गारखेडा परिसर १, रशीदपुरा १, जय गजानन नगर १, अन्य १, कैलास नगर १, एन दोन सिडको ३, जोहरीवाडा, गुलमंडी १, राजेसंभाजी नगर १, बन्सीलाल नगर १, रमा नगर १, हनुमान नगर २, सातारा परिसर १, मयूर पार्क १ या भागातील कोरोनाबाधित आहेत.

ग्रामीण भागातील रुग्ण
मांडकी २, सिडको महानगर दोन, वाळूज ४, सिद्धीविनायक हाऊसिंग सोसायटीजवळ, बजाज नगर २, राजतिलक हाऊसिंग सोसायटी बजाज नगर ५, ओयासिस चौक, पंढरपूर १, ग्रोथ सेंटरजवळ, बजाज नगर १, हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर २, सारा गौरव, बजाज नगर २, जय भवानी चौक, बजाज नगर १, एन अकरा, मयूर नगर, हडको २, पंचगंगा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, दीपज्योती हाऊसिंग सोसायटी बजाज नगर १, संजीव हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, बीएसएनएल गोदामाजवळ बजाज नगर १, वडगाव १, विराज हाईट, बजाज नगर १, दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर ३, भाग्योदय हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, करमाड ६, फत्तेह मैदान, फुलंब्री १, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री १, कोलघर २, गजगाव, गंगापूर १, लासूर नाका,गंगापूर १, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, शिवूर बंगला २, कविटखेडा, वैजापूर १, शिवूर ५, मधला पाडा, शिवूर, वैजापूर १ या भागातील कोरोनाबाधित आहेत. या रुग्णांमध्ये ५५ महिला आणि १०८ पुरुष बाधितांचा समावेश आहे.

कोरोनाबाधित वृद्धाचा मृत्यू

गोरखेडा येथील ६६ वर्षीय कोरोनाबाधित वृद्ध रुग्णाचा २३ जून रोजी मध्यरात्री १२.४५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील विविध खासगी रुग्णालयांत जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण ५४, घाटीमध्ये १४८ आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात एक अशा एकूण २०३ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Web Title: coronavirus Record-breaking increase in new cases in Aurangabad: Addition of 163 patients, one death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.