Coronavirus : औरंगाबादला कोरोनाचा विळखा; दिवसभरात चार बाधितांचा मृत्यू, ९३ नव्या रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 12:08 AM2020-05-16T00:08:46+5:302020-05-16T00:09:18+5:30

शुक्रवारी दिवसभरात तब्बल ९३ रुग्णांची वाढ झाली असून रुग्णसंख्या ८४२ वर गेली. 

Coronavirus: Coronavirus spreads to Aurangabad; Four infected deaths in a day, 93 new patients added | Coronavirus : औरंगाबादला कोरोनाचा विळखा; दिवसभरात चार बाधितांचा मृत्यू, ९३ नव्या रुग्णांची भर

Coronavirus : औरंगाबादला कोरोनाचा विळखा; दिवसभरात चार बाधितांचा मृत्यू, ९३ नव्या रुग्णांची भर

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत २५ कोरोनाबाधितांचा मृत्यू३३ रुग्ण कोरोनामुक्त

औरंगाबाद : शहरात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ८६ बाधित आढळून आल्यानंतर रात्री आणखी ७ पॉझिटिव्ह रुग्णांचीभर पडली आहे. यामुळे शुक्रवारी दिवसभरात तब्बल ९३ रुग्णांची वाढ झाली असून रुग्णसंख्या ८४२ वर गेली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यासोबतच दिवसभरात चार बाधितांचा मृत्यू सुद्धा झाला आहे. यामुळे शहरात आतापर्यंत  बाधितांच्या मृत्यूची संख्या २५ वर गेली आहे.

रात्री शहरातील हिमायत नगर १, बहादुरपुरा १, रऊफ काॅलनी १, रोशनगेट १, फुलशिवरा २, न्यायनगर १  या भागात सात पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर शहरातील नविन हनुमान नगर, बायजीपुरा, शहानुरमिया दर्गा परिसर आणि हिमायत नगर या भागातील बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

३३ जण रुग्णालयातून घरी 

संजय नगर ८, किलेअर्क ३, जयभिमनगर ६, ३ एसआरपीएफ जवान, बाैद्ध नगर २, समता नगर १, किलेअर्क ८, उस्मानपुरा १, दाैलताबाद १ असे एकुण ३३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यामुळे आतापर्यंत शहरातून कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या २६३ झाली आहे.

दिवसभरात चार मृत्यू

नविन हनुमाननगर गल्लीनंबर १ दुर्गामाता मंदिर परिसरातील ७४ वर्षीय वृद्ध कोरोना पाॅझीटीव्ह असल्याने जिल्हा रुग्णालयात भरती होते. तब्बेत बिघडल्याने त्यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घाटी रुग्णालयात हवण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु असतांना ३.४५ वाजता त्यांचा मृत्यु झाला. त्यांना तीव्र अडथळ्याचा फुफ्फुसाचा आजारासोबत उच्चरक्तदाबाने त्यांचा मृत्यु झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.

बायजीपुरा येथील ७० वर्षीय वृद्धाला १० मे रोजी सव्वा दोन वाजता घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब पाॅझीटीव्ह आला होता. त्यांचा शुक्रवारी दुपारी तीन वाजता मृत्यु झाला. कोरोनामुळे त्यांच्या विविध अवयवांचे कार्य प्रभावित झाले होते. दोन्ही बाजुंचा न्युमोनिया, हृदयविकारही होता. त्यामुळे त्यांचा मृत्यु झाल्याचा अहवाल डाॅक्टरांनी दिला आहे. 

शाहनुरमियाॅं दर्गा परिसरातील ५७ वर्षीय व्यक्तीला खाजगी रुग्णालयातून ११ मे रोजी घाटीत हलवण्यात आले होते. त्यांचा १२ मे रोजी त्यांचा स्वॅबचा अहवाल पाॅझीटीव्ह आला. त्यांचे रक्तातील आॅक्सीजनचे प्रमाण कमी झाले होते. तर रक्तगोठण्याची प्रक्रीया वाढली होती. पुर्वीचा मधुमेह असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हिमायतनगर येथील ४० वर्षीय मानसिक आजारी असलेल्या  व्यक्तीला मंगळवारी पहाटे ५.४५ ला घाटी रुग्णालयात अपघात विभागात दाखल करण्यात आले होते. खोकला, तीव्र श्वसनविकार असल्याने त्यांना कृत्रीम श्वाच्छोस्वास देण्यात आला होता. सकाळी ११.१५ वाजता त्यांचा मृत्यु झाला. त्यांचा स्वॅबचा अहवाल दुपारी पाच वाजचा पाॅझीटीव्ह आला. 

शुक्रवारी आढळून आलेले एकूण रुग्ण याप्रमाणे :

एन सहा,सिडको (2), बुढीलेन (1), रोशन गेट (2), संजय नगर (1), सादात नगर (1), भीमनगर, भावसिंगपुरा (2), वसुंधरा कॉलनी (1), वृंदावन कॉलनी (3), न्याय नगर (8), कैलास नगर (1), पुंडलिक नगर (8),सिल्क मील कॉलनी (7), हिमायत नगर (6), चाऊस कॉलनी (3), भवानी नगर (4), जुना मोंढा, भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (4) हुसेन कॉलनी (19), प्रकाश नगर (1) शिव कॉलनी गल्ली नं. 5, पुंडलिक नगर (1), हुसेन कॉलनी, गल्ली नं. 5 (2), बायजीपुरा (7), हनुमान नगर (1), हुसेन नगर (1), अमर सोसायटी (1), न्यू हनुमान नगर, गल्ली नं.1, दुर्गा माता मंदिर (1), फुलशिवरा गंगापूर (2), बहादूरपुरा (1), रऊफ कॉलनी (1) असे दिवभरात ९३ रुग्ण शहरात आढळून आले आहेत.
 

Web Title: Coronavirus: Coronavirus spreads to Aurangabad; Four infected deaths in a day, 93 new patients added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.