coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या ५०० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 10:51 PM2020-08-05T22:51:04+5:302020-08-05T22:52:41+5:30

सध्या जिल्ह्यात ३४७० रुग्णांवर उपचार सुरू

coronavirus: Corona death toll rises to 500 in Aurangabad district | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या ५०० वर

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या ५०० वर

googlenewsNext
ठळक मुद्देबुधवारी ३४१ रुग्णांची भर जिल्ह्यात आज ८ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ३४१ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर बुलढाणा येथील एका रुग्णाचा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ५०० झाली.

जिल्ह्यात मार्चपासून आतापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १५, ४९१ एवढी झाली आहे. यातील ११,५२१ रूग्ण बरे झाले आहेत, तर सध्या ३४७० जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. वडोदबाजार-फुलंब्री येथील ५३ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ६१ वर्षीय महिला, छावणीतील ६७ वर्षीय पुरुष, एन-६, संभाजी कॉलनीतील ५० वर्षीय पुरुष, चिकली-बुलढाणा येथील ४८ वर्षीय पुरुष, आंभई-सिल्लोड येथील ७३ वर्षीय पुरुष आणि साजापूर येथील ७१ वर्षीय पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला, अशी माहिती घाटी प्रशाशनाने दिली.तर खाजगी रुग्णालयात हडकोतील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ग्रामीण भागातील ४७ आणि मनपा हद्दीतील १०६ रुग्णांना सुटी देण्यात आली. 

ग्रामीण भागांतील रूग्ण
डॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड १, विहामांडवा, पैठण १, दत्तनगर, वैजापूर १, चिंचबन कॉलनी, बजाजनगर २, द्वारकानगरी, बजाजनगर १, आयोध्यानगर, बजाजनगर १, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर ७, नागापूर, कन्नड ३, बेलखेडा, कन्नड १, चंद्रलोकनगरी, कन्नड १, शिवनगर, कन्नड ३, पिशोर, कन्नड १, गुजराती गल्ली, वैजापूर ७, स्टेशन रोड, वैजापूर १, जामा मस्जिद परिसर, वैजापूर १, परसोडा, वैजापूर १, निल्लोड, सिल्लोड १, पिंपळवाडी, पैठण १, पोलिस स्टेशन रोड, वैजापूर १, नवगाव, पैठण १, औरंगाबाद ३५, फुलंब्री २, गंगापूर ३४, कन्नड ५, सिल्लोड २८, वैजापूर १४, पैठण २७, ओमसाई नगर, रांजणगाव १, दत्तनगर, वाळूज १, यसगाव दिघी १, गांधीनगर, रांजणगाव १. 

मनपा हद्दीतील रूग्ण 
जोगेश्वरी १, श्रीराम पार्क,राम गोपालनगर, पडेगाव १, रघुवीरनगर १, उस्मानपुरा १, क्रांतीनगर २, एकनाथनगर, उस्मानपुरा १, अयोध्यानगर ३, संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पद्मपुरा २, न्यू शांतीनिकेतन कॉलनी १, एसटी कॉलनी, फाजिलपुरा १,एन बारा स्वामी विवेकानंदनगर १, म्हाडा कॉलनी १, एन नऊ, श्रीकृष्णनगर, टीव्ही सेंटर १, टीव्ही सेंटर १, बीड बायपास २, प्रसादनगर, कांचनवाडी १, शिवनेरी कॉलनी १ मयूर पार्क १, एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको १ , श्रेय नगर १, क्रांतीनगर १, शांतीपुरा छावणी १, कानिफनाथ कॉलनी, भावसिंगुपरा १, बैद सावंगी १, प्रगती कॉलनी १, बेगमपुरा १, शांतीपुरा १, सिडको, एन अकरा १.

सिटी एंट्री पॉइंटवरील रूग्ण
प्रतापनगर १, बिडकीन १, उत्तरानगरी २, टीव्ही सेंटर १, जयभवानीनगर १, एन चार १, बालानगर, पैठण १, चित्तेगाव १, लासूर स्टेशन २, करमाड १, अंबिकानगर १, कन्नड १, पडेगाव १, पदमपुरा १, बिडकीन १, पिंपरी राजा १, सातारा परिसर १, द्वारका नगर १, शिवाजीनगर १, भावसिंगपुरा १, आंबे लोहळ १, बजाजनगर ३, रांजणगाव ४, म्हारोळा १, कांचनवाडी १, एन चार ३, चिश्तीया कॉलनी १, मिसारवाडी १, नक्षत्रवाडी १, जयभवानीनगर २, गिरनेर तांडा १, वानखेडेनगर १, मयूर पार्क १, ईटाळा ३, गजानन महाराज मंदिर जवळ १, अन्य १.

Web Title: coronavirus: Corona death toll rises to 500 in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.