Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात दुपारपर्यंत १६३ रुग्णांची वाढ; ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 05:36 PM2020-07-15T17:36:13+5:302020-07-15T17:38:42+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत ९२२८ कोरोनाबाधित आढळले आहेत

Coronavirus In Aurangabad: An increase of 163 patients in the district till noon; 4 deaths | Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात दुपारपर्यंत १६३ रुग्णांची वाढ; ४ मृत्यू

Coronavirus In Aurangabad : जिल्ह्यात दुपारपर्यंत १६३ रुग्णांची वाढ; ४ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे५३५५ रूग्ण बरे झाले आहेत.सध्या ३५०५ जणांवर उपचार सुरु आहेत. 

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी सकाळी ३९ कोरोनाबाधितांची वाढ झाल्यानंतर दुपारी आणखी १२४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह (सकारात्मक) आला. यात मनपा हद्दीतील ६९ आणि ग्रामीण भागातील ५५ रुग्णांचा समावेश आहे. यासोबतच चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९२२८ कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी ५३५५ रूग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण ३६८ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३५०५ जणांवर उपचार सुरु आहेत. 

चार कोरोनाबाधितांचा मृत्यू
चिकलठाणा येथील ४५ वर्षीय पुरुष , हिलाल कॉलनीतील ६५ वर्षीय पुरुष आणि घाटी येथील निवासस्थानातील ७० वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह पुरुषाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने बुधवारी दिली. तर खासगी रुग्णालयात सिल्लोड येथील आझाद नगरातील ५९ वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मनपा हद्दीतील रुग्ण 
अयोध्यानगर १, छावणी १, एकता कॉलनी १ गजानन कॉलनी १, रोजा बाग १, जवाहर नगर १, जुने मुकुंद नगर १, पैठण रोड १, शिवाजीनगर १, श्रेयनगर ,१ ठाकरे नगर १, एन दोन सिडको १, भीम नगर १, नंदनवन कॉलनी १, शेंद्रा एमआयडीसी १, उत्तरानगरी १, घाटी परिसर१, एस टी कॉलनी ३, अशोक नगर, हर्सुल १, जाधववाडी १, जय भवानी नगर १, रमा नगर ४, दत्त नगर १, नक्षत्रवाडी ३, नगर नाका ५ मिसारवाडी १३, , चेलिपुरा २, मिलिंद नगर ११ पद्मपुरा १, अन्य ६.

ग्रामीण भागातील रुग्ण 
जिकठाण १, बोरगाव, सिल्लोड १, देवरंगारी, कन्नड १, मालपाणी रेसिडन्सी १, रेणुका नगर, शिवाजी नगर १, अयोध्या नगर १, बजाजनगर ५, आनंद जनसागर, बजाजनगर १, छत्रपतीनगर, बजाजनगर ३, गंगोत्री पार्क १, स्वस्तिकनगर, बजाजनगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी ५, लोकमान्य चौक, बजाजनगर १, ओमसाईनगर, रांजणगाव १,प्रताप चौक, बजाजनगर १, राम मंदिर परिसर,म्हाडा कॉलनी, बजाज नगर ३, सरस्वती सो., १, राधाकृष्ण सो., १ ,एसटी कॉलनी, बजाज नगर १, साई प्रतिज्ञा, अपार्टमेंट ३, पळसवाडी, खुलताबाद ७, बोरगाववाडी, सिल्लोड २, गणेश कॉलनी, सिल्लोड ३, घाटनांद्रा, सिल्लोड २, म्हसोबा नगर, सिल्लोड १, पळशी, सिल्लोड १, शास्त्री कॉलनी, सिल्लोड १, श्रीकृष्ण नगर, सिल्लोड १, शिक्षक कॉलनी २ टिळक नगर, सिल्लोड १.

Web Title: Coronavirus In Aurangabad: An increase of 163 patients in the district till noon; 4 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.