coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १४३ देशांपेक्षाही कोरोना रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 07:27 PM2020-08-12T19:27:17+5:302020-08-12T19:31:39+5:30

रुग्णसंख्या वाढल्याने मृत्यूदर घटलेला दिसत असला तरी साडेपाचशेवर मृत्यू झाले आहेत.

coronavirus: Aurangabad district has more corona patients than 143 countries | coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १४३ देशांपेक्षाही कोरोना रुग्ण अधिक

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यात १४३ देशांपेक्षाही कोरोना रुग्ण अधिक

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात मार्च महिन्यात कोरोना संक्रमण सुरू झालेरुग्णभरतीचा आकडा वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती

औरंगाबाद : कोरोनासंक्रमित २१५ देशांपैकी ७२ देशांत बाधितांची संख्या औरंगाबादपेक्षा अधिक आहे, तर उर्वरित १४३ देशांत औरंगाबाद जिल्ह्यापेक्षा बाधितांचा आकडा कमी आहे. औरंगाबाद जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा १७ हजार पार गेला असून, बुधवारपर्यंत ५६५ मृत्यू झाले.

शहरात मार्च महिन्यात कोरोना संक्रमण सुरू झाले, तेव्हापासून नव्या बाधितांची भर पडण्यात खंड पडलेला नाही. सुरुवातीला काही वसाहतींत असलेले संक्रमण जिल्ह्यात पसरले. विक्रमी तपासणी, नाकाबंदी, सीमाबंदी, लॉकडाऊनच्या माध्यमातून विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. मात्र, रुग्ण व मृत्यूसंख्येत घट झालेली नाही. रुग्णसंख्या वाढल्याने मृत्यूदर घटलेला दिसत असला तरी साडेपाचशेवर मृत्यू झाले, तर रुग्णभरतीचा आकडा वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत ७३.५३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले ही दिलासादायक बाब असली तरी २३.१९ टक्के बाधितांवर उपचार सुरू आहेत.  उपचारादरम्यान आतापर्यंत ३.२७ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी दीडशेवर देशांसह भारताच्या मृत्यूदरापेक्षाही जास्त असल्याचे दिसते.


देश     एकूण बाधित    मृत्यू    कोरोनामुक्त    उपचार सुरू
औरंगाबाद     १७३०४    ५६२    १२८३३    ३९०९
आयव्हरी कोस्ट    १६,७१५    १०५    १२,९२६    ३,६८४
डेन्मार्क      १४, ८१५    ६२०     १२,९२५    १२७०
दक्षिण कोरिया     १४,८१५     ३०५     १३६५८    ६६३
पॅलेस्टिन     १४,५१०    १००     ८,०४५    ६,३६५
बल्गेरिया    १३,३९६    ४४७     ७,७७२     ५,१५५
सुदान     ११,९५६    ७८१     ६,२६६    ४,९०९
उत्तर मॅसेडोनिया    ११,८३९    ५२७     ७,६६४    ३,६४८
सेनेगल     ११,३१२    २३६     ७,३९०    ३,६८६
नॉर्वे     ९,६६१     २५६    ८,८५७    ५४८
मलेशिया    ९०९४     १२५     ८,८०३    १६६
लिबिया     ५४५१     ११९    ७०१    ४६३१
हाँगकाँग    ४१४९    ५५    २९१६    ११७८
थायलंड    ३३५१    ५८    ३१६०    १३३
क्युबा    २९५३    ८८     २४५१    ४४१
श्रीलंका    २८४४    ११    २५९३    २४०
व्हिएतनाम    ८४७    १३     ३९९    ४३५ 

Web Title: coronavirus: Aurangabad district has more corona patients than 143 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.