coronavirus : औरंगाबाद @ १२१८; दिवभरात ३२ नव्या बाधितांची भर, तीन मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 08:05 PM2020-05-22T20:05:08+5:302020-05-22T20:06:41+5:30

शहरात दुपारी शिवाजी नगर येथे एक बाधित आढळला तर सायंकाळी टाइम्स कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, कटकट गेट, रवींद्र नगर बजाज नगर येथे प्रत्येकी एक बाधित आढळून आला.

coronavirus: Aurangabad @ 1218; During the day, 32 new positives, 3 deaths due to corona virus | coronavirus : औरंगाबाद @ १२१८; दिवभरात ३२ नव्या बाधितांची भर, तीन मृत्यू

coronavirus : औरंगाबाद @ १२१८; दिवभरात ३२ नव्या बाधितांची भर, तीन मृत्यू

googlenewsNext

औरंगाबाद :  शुक्रवारी सकाळी २६ बाधित रुग्णांची वाढ झाल्यानंतर दुपारी एक आणि सायंकाळी पाच बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२१८ झाली. तर तीन बाधितांच्या मृत्यूने आतापर्यंतचा मृतांचा आकडा ४५ झाला आहे. शहरात आतापर्यंत ५५७ रुग्ण उपचार घेवून घरी परतले असुन ६१६ जणांवर उपचार सुरु आहेत. 

शहरात दुपारी शिवाजी नगर येथे एक बाधित आढळला तर सायंकाळी टाइम्स कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, कटकट गेट, रवींद्र नगर बजाज नगर येथे प्रत्येकी एक बाधित आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. 

तीन बाधितांचा मृत्यू 
संजय नगर येथील ४१ वर्षीय महिला व बहादुरपुरा येथील ७० वर्षीय वृद्धेचा कोरोनाच्या उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. यानंतर दुपारी बाजाजीपुरा येथील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याने दिवसभरात तीन बाधितांच्या मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील आतापर्यंतचा मृतांचा आकडा ४५ झाला आहे.

दिवभरात वाढलेले रुग्ण याप्रमाणे :
जयभीम नगर ५, गरम पाणी २, रेहमानिया कॉलनी २, कुवारपल्ली, राजा बाजार १, सुराणा नगर १, मिल कॉर्नर १, न्याय नगर ४, भवानी नगर, जुना मोंढा २, रहीम नगर, जसवंतपुरा १, पुंडलिक नगर, गल्ली नं. १० येथील १, सातारा परिसर १, जवाहर कॉलनी १, टाइम्स कॉलनी ( कटकट गेट ) ३, एन २ ‍ठाकरे नगर -१, शिवाजीनगर, टाइम्स कॉलनी, रोशन गेट, कैलास नगर, कटकट गेट, रवींद्र नगर बजाज नगर येथे प्रत्येकी एक बाधित आढळला आहे.

Web Title: coronavirus: Aurangabad @ 1218; During the day, 32 new positives, 3 deaths due to corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.