इंग्लंडहून आलेला आणखी एक प्रवासी कोरोनाबाधित; २९ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 12:26 PM2020-12-28T12:26:58+5:302020-12-28T12:28:59+5:30

coronavirus in Aurangabad : तरुणाला चिकलठाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

coronavirus : Another traveler from England was coronated; 29-year-old's report is positive | इंग्लंडहून आलेला आणखी एक प्रवासी कोरोनाबाधित; २९ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

इंग्लंडहून आलेला आणखी एक प्रवासी कोरोनाबाधित; २९ वर्षीय तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

googlenewsNext
ठळक मुद्देयाआधी इंग्लंडहून आलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. आतापर्यंत इंग्लंडहून आलेले दोघे जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ५ नागरिकांचा अद्यापही शोध लागलेला नाही

औरंगाबाद : इंग्लंडहून आलेला २९ वर्षीय तरुण रविवारी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या तरुणाची शनिवारी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्याला चिकलठाणा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

याआधी इंग्लंडहून आलेली ५७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली. आतापर्यंत इंग्लंडहून आलेले दोघे जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मनपा प्रशासनाने इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले. शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेला धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यापाठोपाठ रविवारी ब्रिटन येथून आलेला एक २९ वर्षीय तरुण (रा. आरेफ कॉलनी) कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या तरुणाची काल (शनिवारी) आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्याच्या चाचणीचा अहवाल आज प्राप्त झाला. या तरुणाला जिल्हा सामान्य रुग्णालय, चिकलठाणा या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

१३ पैकी ८ जणांची कोरोना चाचणी
महापालिका क्षेत्रातील १३ नागरिकांचा शोध लागत नसल्यामुळे मनपा प्रशासनाने त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाला यादी सादर केली होती. पोलीस प्रशासनाकडून शोध घेतला जाणार असल्याचे कळताच १३ पैकी ८ नागरिकांनी कोरोना चाचणी करून घेतली; परंतु ५ नागरिकांचा अद्यापही शोध लागलेला नाही, असेही डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

Web Title: coronavirus : Another traveler from England was coronated; 29-year-old's report is positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.