coronavirus: 70th victim of coronavirus in Aurangabad; Woman dies from Nizamganj Colony | coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ७० वा बळी; निझामगंज कॉलनीतील महिलेचा मृत्यू

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ७० वा बळी; निझामगंज कॉलनीतील महिलेचा मृत्यू

औरंगाबाद : निझामगंज कॉलनी येथील ५२ वर्षीय कोरोनाबाधीत महिलेचा शनिवारी (दि.३०) सायंकाळी ५.२० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ७० कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात रविवारी सकाळी ४२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १५४० झाली असून यापैकी ९८४ कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर ४८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

 
भवानी नगर, जुना मोंढा- ४, कैलास नगर, गल्ली नं. दोन-३, एन सहा, सिडको-३, जाफर गेट, जुना मोंढा-१,  गल्ली नं १७, संजय नगर मुकुंदवाडी-१, गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा-१, व्यंकटेश नगर, जालना रोड-१, समता नगर-१,  नवीन बायजीपुरा-१, अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर -१,किराडपुरा- ३, पिसादेवी रोड -१, बजाज नगर- १, देवळाई परिसर -१,  नाथ नगर -१, बालाजी नगर -१, हमालवाडी -१,  जुना बाजार -२, भोईवाडा -१, मनजित नगर, आकाशवाणी परिसर -२, सुराणा नगर- १,  अझम कॉलनी- १, सादात नगर -१, महेमुदपुरा, हडको -१, निझामगंज कॉलनी -१, शहागंज -१, गल्ली नं. २४ संजय नगर -१, बीड बायपास रोड- १, स्वप्न नगरी -१, अन्य -२ या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये  २४ महिला आणि १७ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: coronavirus: 70th victim of coronavirus in Aurangabad; Woman dies from Nizamganj Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.