CoronaVirus in Aurangabad : जिल्ह्यात ६३१ कोरोना रुग्णांची वाढ, ३५ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 12:08 PM2021-05-14T12:08:36+5:302021-05-14T12:10:28+5:30

Corona virus in Aurangabad: जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ११४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २५ हजार २७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

Corona virus in Aurangabad: Increase of 631 corona patients in the district, 35 patients died | CoronaVirus in Aurangabad : जिल्ह्यात ६३१ कोरोना रुग्णांची वाढ, ३५ रुग्णांचा मृत्यू

CoronaVirus in Aurangabad : जिल्ह्यात ६३१ कोरोना रुग्णांची वाढ, ३५ रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे ७९७ रुग्णांना सुटी६,९९१ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ६३१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि ७९७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ३५ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २२ आणि अन्य जिल्ह्यांतील १३ रुग्णांचाही मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६,९९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ११४ झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख २५ हजार २७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत २,८४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या रुग्णांत शहरातील २१६, तर ग्रामीण भागातील ४१५ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १९५ आणि ग्रामीण भागातील ६०२, अशा ७९७ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना हर्सूल येथील ८१ वर्षीय पुरुष, पैठण येथील ६५ वर्षीय महिला, वांजोळा येथील ५० वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ५० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ३३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ५० वर्षीय महिला, गंगापूर येथील ६० वर्षीय पुरुष, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, चितेगाव येथील ५७ वर्षीय महिला, वैजापूर येथील ५४ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४२ वर्षीय पुरुष, लासूर स्टेशन येथील ७० वर्षीय पुरुष, हनुमाननगर येथील ७५ वर्षीय महिला, गुरुनगर, एन-८ येथील ७९ वर्षीय पुरुष, अडूळ, पैठण येथील ६० वर्षीय महिला, तुर्काबाद खराडी, गंगापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, लोहगाव, पैठण येथील ५० वर्षीय पुरुष, नांदगाव, वैजापूर येथील ५० वर्षीय पुरुष, भारतनगर, हडकोती ६६ वर्षीय पुरुष, हनुमानगर येथील ७० वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ५२ वर्षीय पुरुष, ५६ वर्षीय महिला, अहमदनगर जिल्ह्यातील ६३ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय महिला, ६५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, मनमाड- नाशिक येथील ६२ वर्षीय महिला, केज, बीड येथील ४५ वर्षीय पुरुष, बुलढाणा येथील ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद २, छत्रपतीनगर १, श्रेयनगर २, बालाजीनगर १, बीड बायपासरोड ४, गारखेडा परिसर २, सातारा परिसर ३, समर्थनगर १, सिग्मा हॉस्पिटलजवळ २, पद्मपुरा १, रामनगर २, नवयुग कॉलनी १, वेदांतनगर १, श्रेयनगर ३, काल्डा कॉर्नर १, नारेगाव १, त्रिमूर्ती र्चौक १, एम.जी.एम. हॉस्पिटल १, मयूर पार्क २, मित्रनगर १, ब्ल्यू बेल्स, एम.आय.डी.सी. चिकलठाणा १, क्रांती चौक १, कोकणवाडी २, देवळाई ३, पडेगाव, शिवपुरी १, मुंकदवाडी ५, न्यू हनुमाननगर २, ठाकरेनगर १, शेंद्रा फाटा १, संघर्षनगर १, एस. टी. कॉलनी १, जयभवानीनगर १, मायानगर १, शिवाजीनगर १, इंदिरानगर १, गजानननगर १, सिद्धेश्वरनगर १, गांधीनगर १ , जाधववाडी २, आनंदनगर १, वानखेडेनगर ६, म्होसाबानगर ३, हडको १, मयूर पार्क १, नंदनवन कॉलनी १, लक्ष्मी कॉलनी १, शिवकृपा कॉलनी १, दिशानगरी १, प्रोफेसर कॉलनी १, खाराकुआँ १, हर्सूल १, मयूरनगर १, जयसिंगपुरा १, भगतसिंगनगर १, मिल कॉर्नर १, देवानगरी २, राजनगर १, जिजामातानगर १, भावसिंगपुरा १, एन-२ येथे २,एन-१२ येथे १, एन-५ येथे ४, एन-३ येथे २, एन- ४ येथे २, एन-७ येथे २, एन-८ येथे १, एन-६ येथे १, एन-९ येथे ३, अन्य १०९

ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर ४, रांजणगाव वाळूज एम.आय.डी.सी ४, सिडको, वाळूज महानगर ५, चित्तेगाव, ता.पैठन १, भेंडाळा, ता. गंगापूर १, उंडणगाव, ता. सिल्लोड २, पिशोर, ता. कन्नड १, कांचनवाडी ५, केसापूर ता. पैठण १, वैजापूर १, पिसादेवी ५, बोरगाव ता. सिल्लोड १, इस्लामपूरवाडी १, कडेठाण ता. पैठन १, मालुंजा , ता. गंगापूर १,पैठन १, मनीषानगर, वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, घाणेगाव, ता.गंगापूर १, परिजातनगर, म्हाडा तिसगाव १, तिरुपती हॉस्पिटल वाळूज ३, अन्य ३७३

Web Title: Corona virus in Aurangabad: Increase of 631 corona patients in the district, 35 patients died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.